आळेफाटा :
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद जुन्नर तालुका आयोजित जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार रोकडे फार्म मंगल कार्यालय बेजवाट जुन्नर येथे दि 1 ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाला. पुणे जिल्ह्यातील 52 पुरस्कारार्थी शिक्षकांना सदर पुरस्कार शिक्षक आमदार कोकण विभाग ज्ञानेश्वर म्हात्रे जुन्नर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. आळेफाटायेथील शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचे कार्यकुशल मुख्याध्यापक इम्तियाज नबीलाल मुलाणी यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले. यावेळी अनिल रोकडे, आळे गावचे उपसरपंच विजय कुऱ्हाडे, तनिष्का व्यासपीठ अध्यक्षा उज्ज्वला शेवाळे, गुलाबराव गवळे, तुकाराम बेनके आदी मान्यवर, विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते. गुणवंत पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक मुलाणी सर यांचे शिवछत्रपती नगर विकास संस्थेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष सोमनाथ गडगे, सचिव व विघ्नहर सह. साखर कारखान्याचे माजी संचालक सुरेश गडगे, खजिनदार सुर्यकांत चासकर, संचालक तुषार कदम व विद्यालयाच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. यावेळी पुरस्कार्थी मुलानी सर यांनी हा पुरस्कार माझ्या एकट्याच्या कार्याच्या गौरव नसून माझ्या कुटुंबाचा, माझ्या सर्व सहका-यांचा व माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढली असून यापेक्षाही अधिक जोमाने काम करण्यासाठी मी कटिबद्ध असेल अशा भावना व्यक्त केल्या.
