आळेफाटा (वार्ताहर) :

आळे येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाच्या ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होऊन संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी शालेय पातळीवर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या अपूर्व मेळाव्याचे उद्घाटन संस्था अध्यक्ष अजय नाना कुऱ्हाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या अपूर्व विज्ञान मेळाव्यासाठी आळे गावातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यात आळे गावचे उपसरपंच अँड विजय कुऱ्हाडे, सागर गुंजाळ, अमर सहाणे, महेंद्र पाडेकर , गणेश गुंजाळ, बाजीराव लाड, दिनेश चौगुले, बापू गाढवे, अभिषेक पाडेकर, सुनील कुऱ्हाडे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे शालेय समिती अध्यक्ष संपत गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, बाळकृष्ण जाधव, सौ शामा जाधव, योगेश जाधव, शांताराम कुऱ्हाडे व आदी ग्रामस्थ व मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या मेळाव्यासाठी माध्यमिक विभागातून 114 व उच्च माध्यमिक विभागातून 20 असे एकूण 134 प्रकल्प मांडण्यात आलेहोते. या ठिकाणी माध्यमिक विभागातून खालीलप्रमाणे उत्कृष्ट प्रकल्प निवडण्यात आले. छोटा गट इयत्ता 5 ते 8 वी जयेश बबन सहाणे, अथर्व विनोद दांगट ( ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टीम ), भक्ती नितीन पाडेकर व कीर्ती संतोष कुऱ्हाडे ( ह्यूमन बॉडी सिस्टीम ), पूर्वा दत्तात्रय गुंजाळ(फूड अडल्टरेशन), उत्तेजनार्थसूर्या गणेश जाधव (इलेक्ट्रिक जनरेटर क्रोम वेस्ट मटेरियल आणि सनलाइट), मोठा गट इयत्ता 9 ते 10 वी कुणाल गणेश चाळक व अविष्कार काचळे(स्मार्ट स्ट्रीट लाईट सिस्टीम), ऋतुराज फुलसुंदर, वैभव केळकर, अंगीरस कुलकर्णी(वॉटर प्युरिफिकेशन व स्मोक बबल), अभिषेक राजूखा व सार्थ संदीप डावखर(फायर अलार्म), उत्तेजनार्थ सारंग अमर इंगळे(होम सेक्युरिटी), उच्च माध्यमिक गट इयत्ता 11 ते 12 वी लहोटे रुद्रक्ष संतोष ,फापाळे यश संपत(एलपीजी गॅस डिटेक्टर), खिलारी पूर्वा राजेंद्र (कार एक्सीडेंट प्रीवेंशन), बेलकर अभिषेक जिजाभाऊ (वेडींग मशीन) या अपूर्व विज्ञान मेळावा विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप भवारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.या कार्यक्रमाचे नियोजन उपप्राचार्य भालेराव, उपमुख्याध्यापक कोते, पर्यवेक्षक सूर्यवंशी यांनी केले. हा अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न होण्यासाठी सर्व विज्ञान शिक्षक व प्रयोगशाळा कर्मचारी, शिपाई यांनी मेहनत घेतली. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!