मुंबई :-
गुटखाबंदी असतानाही परराज्यातून येणारा अवैध गुटखा व त्याचे शालेय विद्यार्थी व तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी संबंधित गुटखा कंपनीच्या मालकांवर आणि या अवैध व्यवसायातील सूत्रधारांवरच ‘मोका’ कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. राज्यात छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतला आहे.गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू व सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालयाने उपरोक्त निर्णय घेतला आहे.

