आळे :
२ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन,३६ महाराष्ट्र बटालियन, एन एस एस विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. प्रविण जाधव यांच्या मार्गदर्शना खाली योग दिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी डॉ. अरुण गुळवे आंतरराष्ट्रीय योग शिक्षक-आर्ट्स ऑफ लिव्हिंग यांनी योग विषयक माहिती देत छात्रांकडून विविध योग आसने करवून घेतली. या वर्षी योगा स्वतः साठी आणि समाजासाठी देखील ही संकल्पना आहे आणि एनसीसी छात्रांनी या साठी समाज जागृती करावी असे अवाहन प्रा.संजय वाकचौरे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी डॉ. जयसिंग गाडेकर-एनएसएस विभागप्रमुख यांनी योगाचे महत्त्व विषद करताना डॉ. गुळवे सर यांचे आभार मानून त्यांचा सत्कार केला. मेजर डॉ.सुषमा कदम-२ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन आणि कॅप्टन रावसाहेब गरड-३६ महाराष्ट्र बटालियन यांनी योग दिना साठी विशेष मेहनत घेतली.

विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा.राठोड संतोष यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले.अध्यक्ष अजयनाना कुऱ्हाडे ,बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव अर्जुनशेठ पाडेकर, खजिनदार अरुणशेठ हुलवळे तसेच संचालक किशोरशेठ कु-हाडे,भाउशेठ कु-हाडे, बबन सहाणे , उल्हासशेठ सहाणे, बाबुशेठ कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ , जीवनशेठ शिंदे, दिनेश सहाणे, कैलासशेठ शेळके , प्रदिपशेठ गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे व सर्व संचालक मंडळ यांनी योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योग दिना निमित आपला सहभाग नोंदवून योगा आसने करण्याचा आनंद घेतला
