शेवगाव :
१ ऑक्टोबर रोजी शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरडवाडी येथे “एक तारीख एक तास श्रमदान” हा उपक्रम राबविण्यात आला.शालेय शिक्षण विभाग, भारत सरकार यांनी निर्देशित केले नुसार या कालावधीत संपूर्ण देशामध्ये स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे.या उपक्रमाचा एक भाग म्हणून “एक तारीख एक तास श्रमदान” हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला. शालेय परिसर व शाळे जवळील परिसराची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. तसेच हनुमान मंदिरच्या प्रांगणाची स्वच्छता करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती हिराबाई पोंदे उपक्रमशील शिक्षक श्री सुरेश दातीर, ज्येष्ठ नागरिक सारंगधर देशमुख, त्रिंबक केदार ,ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत गरड ,महादेव गरजे ,जयकुमार देशमुख ,माजी चेअरमन भिवसेन केदार ,त्रिंबक गरड, कैलास शिंदे ,रमेश केदार ,कमलाकर गरड विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
