आंबेगाव ( पुणे ) :

पूर्व आंबेगाव परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या ३० तारखेपासून सुरू केलेल्या कारवाईमुळे अवैध धाबे आणि हातभट्टी दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून रोज दोन वेळा पथक तैनात करून क्रॉस व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या धडक कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या ठिकाणांवर टाळे लागले असून, त्याचा थेट फायदा लायसन्सधारक हॉटेल, बार आणि परमिट रूमना झाला आहे. ग्राहकांची वाढती मागणी आणि गर्दीमुळे परवानाधारक आस्थापनांमध्ये मोठ्या रांगा दिसून येत आहेत.

“अवैध दारू विक्रीवर नियंत्रण आल्यानेच ग्राहक आता वैध मार्गाने दारू खरेदीकडे वळले आहेत. यामुळे आमचा व्यवसाय वाढला आहे आणि महसूलातही वाढ होत आहे,” असे एका लायसन्सधारक बारचालकाने सांगितले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या सातत्यपूर्ण कारवाईमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यास मदत होत असून, नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. विभागाने यापुढेही अशाच प्रकारे कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!