आळेफाटा :

स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाला श्री. बाळासाहेब काकडे सर आणि श्री पिराजी टाकळकर सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व सर्वांनी ध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीताचे गायन केले. याप्रसंगी शाळेच्या संस्थापक श्री अरविंद वैद्य सर, उपाध्यक्ष श्री अजितदादा काकडे,शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रसाद जॉन सर पालक प्रतिनिधी श्री भोसले सर आणि नेहरकर सर व मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

राष्ट्रगाणानंतर याप्रसंगी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रसाद जॉन सर म्हणाले की आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या थोर स्वातंत्र्यसेनानींचे स्मरण करून, प्रत्येक क्षण राष्ट्राकार्य करत आहोत या भावनेने जगायला हवा.

याप्रसंगी स्ट्रॉबेरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. युकेजी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले. श्रीजा नवले , रुचिरा देवकर, पार्थ गोळवा, कादंबरी नवले, पलक पोटे, शामभवी कणसे, अशू फुलसुंदर, स्पृहा फुलसुंदर, श्रीश लामखडे, स्वरा मातेले या विद्यार्थांनी देशभक्तीपर भाषणे केली.

यानंतर देश रंगीला या गीतावर इ. 3 री, 4 थी च्या विद्यार्थ्यांनी मंत्रमुग्ध करणारे नृत्य सादर केले. नृत्य शिक्षिका प्रगती नवले मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून सुंदर नूत्य सादर करून घेतले.

उपाध्यक्ष अजितदादा काकडे सर म्हणाले की, देशाप्रति समर्पण आणि कर्तव्यबुद्धीने कार्य करा. मुलांना जय व पराजय दोन्हींचाही सामना करण्यास शिकवा. मुलांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या बलशाली बनविणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी पालक, विद्यार्थी व शिक्षक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्रमुख पाहुणे पिराजी टाकळकर सर विद्यार्थांना संदेश देताना म्हणाले की असंख्य क्रांतिवीरांच्या बलिदानाने आपणाला स्वातंत्र्य मिळालेले आहे. आपल्या मनामध्ये सदैव देशभक्तीचे विचार तेवत ठेवा व स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून आपण आपल्या कार्यक्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्या.

अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली जाधव मॅडम व दिपाली शिंदे मॅडम यांनी केले. व भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी शाळेचा परिसर दणाणून गेला.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!