पिंपळवंडी ( जुन्नर )

पिंपळवंडी स्टॅन्ड येथे विघ्नहर गणेश मित्र मंडळाच्या वतीने आयोजित भव्य दिव्य रस्सीखेच स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या स्पर्धेत परिसरातील विविध गावांतील संघांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या यशस्वी आयोजनामध्ये मंडळाचे अध्यक्ष प्रकाश शेठ काकडे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते, युवकांनी परिश्रमपूर्वक मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले.

स्पर्धेअखेर विजयी संघांना मंडळाच्यावतीने आकर्षक पारितोषिके वितरण व सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले आणि शिस्तबद्ध वातावरणात संपूर्ण स्पर्धा पार पडल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

विघ्नहर गणेश मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे गावभरातून कौतुक होत असून, अशा स्पर्धांमुळे तरुणांमध्ये एकोपा, संघभावना आणि स्पर्धात्मकता वृद्धिंगत होते, असे प्रतिपादन ग्रामस्थांनी केले.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!