पुणे :
दिनांक १९/०७/२०२४ रोजी स.प.महाविद्यालय,पुणे येथे क्विक हिल फाउंडेशनच्या ” सायबर शिक्षा फाॅर सायबर सुरक्षा २०२४-२५ “ या अभियानासाठी निवड करण्यात आलेल्या पुणे विभागातील सात महाविद्यालयांचे क्लब ऑफिसर्स,विद्यार्थि प्रतिनिधी, प्राचार्य व शिक्षक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सायबर वाॅरीअर्सच्या क्लबचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व क्लब ऑफिसर्स, विद्यार्थि प्रतिनिधींचा सत्कार मा.अनुपमा काटकर ( चेअरपर्सन-क्विक हिल फाउंडेशन ) यांच्या हस्ते करण्यात आला,यामध्ये आळे महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातील अक्षदा हाडवळे (क्लब प्रेसिडेंट) , मिसबाह ईनामदार ( क्लब सेक्रेटरी ) , वरद वाघ ( कम्युनिटी डायरेक्टर ) , रोहन टाकळकर ( पी.आर. मेडिया डायरेक्टर ) व निवड झालेल्या इतर २६ विद्यार्थी प्रतीनीधींचा समावेश आहे.प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रवीण जाधव यांना क्विक हिल फाउंडेशनच्या प्रकल्पातील सहभागाबद्दल अधिकृतता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा.अजय शिर्के ( सह.संचालक क्विक हिल फाउंडेशन ) यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारधारेला केंद्रस्थानी मानून काम करताना समाज,देश सेवा यांचा विचार मनात तेवत ठेवत स्वतःमधील बदलाने सुरूवात करत समाज व्यापी काम आपल्या सर्वांना एकत्रित मिळून करायचे असल्याचे सांगितले,अजय सरांनी मागील वर्षी आळे महाविद्यालयाने तृतीय पंथीयांसमवेत सायबर सुरेक्षेबाबत केलेल्या कामाचा विशेष उल्लेख या प्रसंगी केला.गायत्री केसकर ( एक्झीक्युटिव्ह सी.एस.आर. ) यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले व विद्यार्थ्यांना अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. जाधव, विभाग प्रमुख प्रा. नूतन जोशी व प्रा. दर्शना सहाणे आदि उपस्थित होते.या अभियानासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष अजयनाना कुऱ्हाडे ,बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव अर्जुनशेठ पाडेकर, खजिनदार अरुणशेठ हुलवळे तसेच संचालक किशोरशेठ कु-हाडे,भाउशेठ कु-हाडे, बबन सहाणे , उल्हासशेठ सहाणे, बाबुशेठ कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ , जीवनशेठ शिंदे, दिनेश सहाणे, कैलासशेठ शेळके , प्रदिपशेठ गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे व सर्व संचालक मंडळ यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.