उदापूर :

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदापूर येथील २०१९/२० साली पुणे जिल्हा नियोजन फंडातून जवळपास १४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला होता सदर काम २०२१/२२ साली पूर्ण केले असल्याचे समजते परंतु संबंधित काम आजही अपूर्ण दिसत आहे कामाची एम बी चुकीच्या पद्धतीने तयार करून संपूर्ण निधी ग्रामपंचायत मधून काढून घेण्यात आला आहे त्यामुळे ज्या प्राथमिक शाळेत लहान मुलांचा पाया भक्कम होतो त्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षण मंदिराच्या कामातच संबंधित अधिकाऱ्यांनी जास्तीचे पैसे काढून घेतले असल्याचा आरोप उदापुर गावचे सामाजिक कार्यकर्ते अमोल म्हसने यांनी केला आहे.सदर शाळेच्या नवीन खोल्यांचे काम दिसताक्षणी अपूर्ण वाटत असल्याने मुलांना शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध झाले नाही या खोल्यांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याने शाळेतील नवीन कामाची माहिती म्हसने यांनी मागुन घेतली यामध्ये अनेक ठिकाणचे मोजमाप चुकीचे असल्याचे निदर्शनास आले चुकीच्या पद्धतीने सदर कामाची एम बी तयार करून अतिरिक्त खर्च दाखवला असून एक प्रकारे शासनाच्या पैशाची लयलुट केली असल्याची समजत आहे.सदर खोल्यांच्या वरती पॅरापिट बांधण्यात आलेले नाही कामाच्या स्वरूपाचा फलक कुठेही लागलेला दिसत नाही तरीही सर्व रक्कम ठेकेदाराला वर्ग करण्यात आली आहे कलरकाम व लाईट फिटिंग काम झालेले नाही राहिलेले अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्जुन अमुप व ग्रामपंचायत सदस्य निलेश नारुडकर यांनी केली आहे.शाळेच्या कामात गैरव्यवहार असल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधित अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला परंतु काही दाद भेटत नव्हती त्यामुळे आमदार अतुल बेनके यांच्या कानावर सदर बाब घातली त्यांनी देखील अधिकारी यांना बोलावून प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या तरीही अधिकारी सदर कामाचे मोजमाप करून देण्यात टाळाटाळ करत आहेत.काम अपूर्ण असूनही सर्व पैसे काढून घेतल्याने ही बाब गंभीर असून अधिकारी यांनी खुर्चीवर बसून कामाची एम बी तयार केली आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अमोल म्हसने यांनी केली आहे.

वरिष्ठांनी ग्रामपंचायतला एम बी मूल्यांकन पाठवले व ते अडकून ठेवण्याचा कुठलाही अधिकार ग्रामपंचायतला नाही झालेल्या कामावर देखरेख ठेवण्याचे काम अधिकारी यांचे होते काम अपूर्ण असल्याचा पाठपुरावा करत आहोत पण अधिकारी काम पूर्ण असल्याचे सांगत आहे.सचिन आंबडेकर, सरपंच उदापूर.म्हसने यांनी तगादा लावून धरल्यामुळे बांधकाम विभाग अधिकारी हजारे रावसाहेब सदर ठिकाणी आले परंतु मोजमाप न घेता चार दिवसांत सर्व माहिती घेऊन मोजमाप करून देऊ असे सांगून निघून गेले पंधरा दिवस उलटून गेले तरीही ते इकडे फिरवले नाही आणि फोन सुद्धा उचलत नाही.

फैय्याज इनामदार
प्रतिनिधी

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!