सोलापूर :

दिनांक 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान गंगापूर छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धा मुले व मुली या स्पर्धेकरिता सोलापूर जिल्ह्यातील मुलांचे व मुलींचे सब ज्युनिअर संघ निवडण्याकरिता सोलापूर शहर व जिल्हा डॉजबॉल असोसिएशनच्या वतीने दिनांक १६ व १७ सप्टेंबर २०२३रोजी कै. स्मिता सुधीर खरटमल यांच्या स्मरणार्थ जिल्हा अजिंक्यपद डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या मुलींच्या गटाने तृतीय क्रमांक व मुलांच्या गटाने तृतीय क्रमांक पटकावला .

या सुयशाबद्दल श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे चेअरमन श्री धर्मराज काडादी तसेच श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य डॉ. राजशेखर येळीकर,श्री भीमाशंकर पटणे, श्री गुरुराज माळगे, श्री. मल्लिकार्जुन कळके व शाळेचे मुख्याध्यापक श्री योगेश राऊत पर्यवेक्षक श्री शिवराज बिराजदार व सर्व शिक्षक वृंद यांनी निवड झालेल्या संघाचे अभिनंदन केले. विजेत्या खेळाडूंना क्रीडाशिक्षक श्री पवन भोसले यांनी मार्गदर्शन केले.

 

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!