शेवगाव :
शेवगाव तालुक्यातील चापडगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची वनभोजन सहल जलशुद्धीकरण केंद्र चापडगाव या ठिकाणी नेण्यात आली होती. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अरुण वावरे यांचे मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे,सहल विभाग प्रमुख सुरेंद्र लोहकरे, गणेश मोरे,संजय मरकड, विष्णू दळे ,श्रीमती वत्सला जाधव, श्रीमती भाग्यश्री घुगे, कुमारी हर्षल भाकरे, नितीनकुमार फोपसे,सर्जेराव निकाळजे आदी सह शिक्षक उपस्थित होते. जलशुद्धीकरण या विषयावर विज्ञान शिक्षक नितीन कुमार फोफसे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली. तसेच जलशुद्धीकरण केंद्राचे प्रमुख श्री बापूसाहेब फलके, संजय गोरे यांनी पाण्याचे प्रदूषण, दूषित पाणी पिल्याने होणारे दुष्परिणाम व जलशुद्धीकरण केंद्राची गरज या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालक श्री अमित भंडारी व गोविंद फाटे यांनी विद्यार्थ्यांना भोजनासाठी मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून गोकुळाष्टमी निमीत्त उत्साहात ‘दहीहंडी’ उत्सव साजरा केला.कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आगळावेगळा आनंद ओसंडून वहात होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव निकाळजे यांनी केले तर आभार अशोक आघवणे सर यांनी मानले.
मधुकर केदार
जिल्हाप्रतिनिधी अहमदनगर.
