सोलापूर :

गुरुविद्या प्रतिष्ठानचे गुरूविद्या आदर्श शिक्षक,शिक्षकेतर पुरस्काराचे समारंभ थाटात वितरण संपन्न झाले.कार्यक्रमाचे सुरूवात मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन करून झाली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मा श्री अशोक भांजे माजी विस्तार अधिकारी सोलापूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.डॉ माधवी रायते. माजी अधिष्ठता. अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर..गुरुविद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सोमशेखर भोगडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सातलिंग शटगार, उपाध्यक्षा सौ राजश्री तडकासे, सहसचिवा सौ रेणुका हब्बू , श्री कॄष्ण परमेश्वर सुतार, श्री काशिनाथ भतगुणकी, प्रतिष्ठानचे सल्लागार श्री मोहन भूमकर, सदस्य श्री विजयकुमार भोगडे नंदीध्वज मानकरी उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रतिष्ठानचे उपाध्यक्षा सौ राजश्री तडकासे यांनी केले.पाहुण्याचे ओळख प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सातलिंग शटगार यांनी केले. ‘गुरूविद्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण’ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रतिष्ठान मधील सर्व शिक्षकांचा सत्कार, विशेष सत्कार श्री मोहन भुमकर अध्यक्ष लायन्स क्लब सोलापूर सिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, श्री अंबादास गवळी, श्री अशोक भांजे, विश्वनाथ आवटे, श्री कृष्ण परमेश्वर सुतार यांना महापालिकेचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यांचाही सत्कार करण्यात आला.पुरस्कार प्राप्त शिक्षक सत्काराला उत्तर श्री प्राध्यापक श्री शावरू जडगे, सौ श्रुती बागेवाडी, सौ मिनाक्षी मेंथे, श्री चंद्रशेखर चौगुले, श्री अविनाश आलदर,यांनी दिले.व्यासपीठावरून श्री अशोक भांजे माजी विस्तार अधिकारी यांनी शिक्षकांचे व प्रतिष्ठानचे कौतुक करून शुभेच्छा, अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती डॉ माधवी रायते यांनी शिक्षकांमुळेच सामाजिक व देशाची प्रगती शक्य आहे, आणि पाच सुत्रे इच्छाशक्ती, सातत्य, आत्मविश्वास, प्रयत्न, चिकाटी शिक्षकांनी अंगीकॄत करावे असे गौरवोद्गार केले. शिक्षक हा समाजाचा कणा आहे. शिक्षकांचे व प्रतिष्ठानचे कौतुक करून अभिनंदन केले. पुरस्कार प्राप्त सौ श्रुती बागेवाडी (मुख्याध्यापिका) मेहता माध्यमिक शाळा, सोलापूर.सौ मीनाक्षी संजीवकुमार मेंथे ( सहशिक्षिका)
इंडियन मॉडेल स्कूल सोलापूर, श्री चंद्रशेखर हणमंत चौगुले.(सहशिक्षक). के. जी.हंचाटे विद्यालय. अक्कलकोट रोड , श्री अभिनंदन वज्रकांत विभुते. (सहशिक्षक ) महावीर हायस्कूल सोलापूर, प्रा. शावरू रेवणा जडगे (प्राध्यापक) एस .व्ही.सी. एस जूनियर कॉलेज, एम.आय.डी.सी. सोलापूर.

श्री जनार्दन प्रभाकर वाघमारे. (सहशिक्षक) आदर्श बालक मंदिर सोलापूर. श्री अविनाश आकाराम आलदर. (सहशिक्षक) शरदचंद्र पवार प्रशाला सोलापूर ,सौ सुनंदा शिवाजी जाधव. (सहशिक्षिका) बेबळगी विद्यालय.सोलापूर.सौ सीमा सुनील जाधव सहशिक्षिका मनपा मराठी मुलांची शाळा क्र 28 सोलापूर. श्री उमेश हनुमंत मल्लापुरे. (प्रयोगशाळा परिचर) सिद्धेश्वर कन्या प्रशाला सोलापूर. यांना पुरस्कारा वितरण थाटात करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप शाल, स्मुती चिन्ह, प्रमाणपत्र, फुलांचे हार, गुच्छ असे होते. तसेच माजी अध्यक्ष प्रा प्रभाकर नागणसुरे यांनी शिक्षकांचे, शिक्षकेतर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा संदेश पाठविले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,सौ शिवलिला भोगडे, सौ नर्मदा कनकी, नेहा भोगडे, श्री विजयकुमार भोगडे, श्री दत्तात्रय जामदार,सौ नमिता थिटे आणि सर्व सन्माननीय सदस्य प्रयत्न केले.शेवटी आभार प्रदर्शन श्री मोहन भूमकर यांनी केले. तर सुत्र संचालन सचिवा सौ श्रीदेवी यळमेली, सौ रेणुका हब्बू यांनी केले.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!