शेवगाव :

आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शेवगाव या ठिकाणी आज एम.पी .एस .सी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला .यावेळी व्यासपीठावर जि .प . सदस्या सौ .हर्षदाताई काकडे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे साहेब, कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती ॲग्रीकल्चर एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून कृषी उपसंचालक पदी नियुक्त झालेले विद्यालयाचे माजी विद्यार्थी मा.पवनकुमार अण्णासाहेब नजन, माननीय ज्ञानेश्वर पंढरीनाथ बढे यांचा यशवंत गुणगौरव सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमा वेळी जगन्नाथदादा गावडे, ह.भ.प.गणेश महाराज डोंगरे,विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते, उपप्राचार्या श्रीम. रूपा खेडकर, उपमुख्याध्यापिका सौ . मंदाकिनी भालसिंग, पर्यवेक्षक श्रीम. पुष्पलता गरुड ,सुनील आव्हाड, प्रा. शिवाजी पोटभरे ,पवनकुमार व ज्ञानेश्वरचे कुटुंबीय आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी विद्यालयाच्या वतीने पवनकुमार नजन यांचा तसेच ज्ञानेश्वर बढे यांचा कुटुंबीयांसमवेत सन्मान करण्यात आला .
सत्काराला उत्तर देताना पवनकुमार नजन यांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले .जीवनात अपयश आले तरी निराश न होता प्रयत्नात सातत्य ठेवून यश संपादक करावे असा पवनकुमारने उपस्थित विद्यार्थ्यांना सल्ला दिला .तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल, फेसबुक, व्हाट्सअप यावर टाइमपास न करता वेळेचा अभ्यासासाठी सदुपयोग करावा.

दुसरे सत्कारमूर्ती ज्ञानेश्वर बढे यांनी विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करून मेहनत, जिद्द ,सातत्य ठेवून यश संपादन करावे असे सांगितले .आबासाहेब काकडे विद्यालयातच माझा पाया पक्का झाला असेही ते म्हणाले .
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ .हर्षदाताई काकडे यांनी पवनकुमार नजन व पंढरीनाथ बढे यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले .जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणाचातरी आदर्श समोर ठेवून कष्ट करावे लागतात.आबासाहेब काकडे शिक्षण समूहात विद्यार्थी हीत लक्षात घेऊन सतत नवनवीन प्रोजेक्ट राबवले जातात .त्याचाच एक भाग म्हणजे क्रॉप सायन्ससारख्या विषयाची सुरुवात,बी.सी.ए व बी सी .एस तसेच विद्यार्थ्यांकरता संडे कॉलेजची संकल्पना होय असे त्या म्हणाल्या .ह .भ . प . गणेश महाराज डोंगरे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून जीवनात यश मिळवावे असा उपदेश केला .श्री .जगन्नाथदादा गावडे यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी न लेखता आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून यश मिळवावे असे सांगितले .ज्ञानेश्वरचे वडील पंढरीनाथ बढे यांनी विद्यालयाने सत्काराचा कार्यक्रम घडवून आणला म्हणून आभार व्यक्त केले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे साहेब यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण व्हावा म्हणून एम.पी.एस .सी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन केले यासाठी विद्यालयाच्या प्राचार्यांचे कौतुक केले .दोनही नवीन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्यातील माणुसकी कायम ठेवून शासन -प्रशासन व जनता यामधील दरी कमी करण्याचे,लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचे ,लोकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे अवाहन केले .विद्यार्थ्यांनी देखील मिळालेल्या संधीचा उपयोग करून आपले भविष्य घडवावे असे त्यांनी अवाहन केले .सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक पर्यवेक्षक प्रा . शिवाजी पोटभरे यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . प्रतिमा उकिर्डे यांनी तर आभार प्रा . ज्ञानेश्वर लबडे यांनी मानले .

मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!