आळे :
आळे ता.जुन्नर येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख कॅप्टन प्रा रावसाहेब गरड तसेच वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापिका मनीषा गिरी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ” पीएचडी ” पदवी प्राप्त झाली.
कॅप्टन प्रा रावसाहेब गरड यांनी ” महाराणा प्रताप संघ ” या संस्थेने क्रीडा क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाचा ” चिकित्सक अभ्यास “ हा विषय घेऊन संचालक विद्यापीठ क्रिडा मंडळ प्रा डॉ दीपक माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर केला होता. संघाचे अध्यक्ष शरद चव्हाण, अशोक भागवत शारिरीक शिक्षण संचालक व सिनेट सदस्य प्रा. डॉ. रमेश गायकवाड शारीरिक शिक्षण संचालक प्रा मगेश पालवे,
प्रा अभिजित कदम, प्रा शोभा भगत, प्रा दत्ता पाचारणे व प्रकाश पवार यांचे त्यांना सहकार्य मिळाले.
प्राध्यापिका मनीषा गिरी यांना ” पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी दुग्ध संस्थांच्या उपपदार्थाच्या वितरण प्रणालीचा अभ्यास “ हा विषय घेऊन माननीय प्राध्यापक डॉक्टर व्ही बी बैरागी सर सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर केला.
सदर पीएचडीच्या संशोधनांमध्ये माननीय प्राध्यापक डॉक्टर जे पी भोसले सर प्रमुख वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजयनाना कु-हाडे उपाध्यक्ष सौरभ डोके सचिव अर्जुन पाडेकर खजिनदार अरुण हुलवळे संचालक बाळासाहेब जाधव भाऊदादा कु-हाडे, किशोर कु-हाडे, बबन सहाणे, उल्हास सहाणे , बाबूशेठ कु-हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवन शिंदे, दिनेश सहाणे, कैलास शेळके, प्रदीप गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कु-हाडे, रमेश कु-हाडे, शांताराम कु-हाडे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी कॅप्टन गरड व प्राध्यापिका गिरी यांचे अभिनंदन केले.तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीयांनी अभिनंदन केले
