सोलापूर :

वर्ष 2022-23 या शैक्षणिक वर्षात यश संपादन केलेल्या दहावीच्या गुणवंतांचा सत्कार सोहळा श्री सिद्धेश्वर प्रशाला येथील सांस्कृतिक भवनात संपन्न झाला.श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे चेअरमन मा. श्री धर्मराजजी काडादी यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे विश्वस्त मा.श्री. डॉ. राजशेखर येळीकर सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार श्री. सुनील मुनाळे सर लाभले तसेच अध्यक्षपदी शाळेचे मुख्याध्यापक श्री. योगेश राऊत पर्यवेक्षक श्री. शिवराज बिराजदार पालक शिक्षक संघाच्या सचिवा सौ. रसिका मिरजकर तसेच शिक्षक सचिवा सौ. रजनी बिराजदार तसेच दहावीच्या सर्व शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सौम्या बसूदे, कु.साक्षी बिराजदार, कु.अपूर्वा कंदीकटला आणि कु.सौंदर्या कलशेट्टी या दहावीच्या विद्यार्थीनींनी केले.

अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणात अतिथींनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती दिली आणि यश साध्य करण्यासाठी एकाग्रता आणि सातत्य या गुणांचा विकास कसा करता येईल याबद्दलही मार्गदर्शन केले. दहावीचे गुणवंत विद्यार्थी यश तिपरादी, योगिता येडूर यांनी आपल्या वैयक्तिक मनोगतात शिक्षकांचे व शाळेचे आभार मानले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी शाळेच्या वतीने आभार प्रदर्शन कु. खुशी दुबे या विद्यार्थिनीने केले.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!