सोलापूर :-

श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित श्री सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळेच्या आवारात संपन्न झाला. सुरुवातीस प्रास्ताविक श्री केदार काशीकर यांनी केले.इयत्ता दहावीच्या सन 1995 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी समवेत त्यावेळेचे एल.केजी ते दहावी पर्यंत शिक्षकवृंद, यावेळी श्री सिध्देश्वर देवस्थान शिक्षण समिती सदस्य
संचालक डॉ श्री राजशेखर येळीकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सतीश गोसावी, पर्यवेक्षक श्री शिवराज बिराजदार, माजी मुख्याध्यापिका सौ अंजली तिवारी मॅडम, श्रीमती एन हेमलता,सौ नंदगिरी, श्रीमती अबिदा शेख,सौ पुष्पा आटंद, सौ सुवर्णा बिराजदार, सौ झुंझरवाड,सौ कामत,सौ शेरू इच्छापुरे,सौ कल्पना अवस्थी,सौ उज्वला कळके,सौ निर्मला परमशेटी,सौ नलिनी बसुदे पाटील, श्री सोमशेखर भोगडे, श्री शशिकांत मोटगी, श्री भावगी व्यासपीठावर उपस्थित होते.

सुरूवातीला स्वागत करून सर्व विद्यार्थांच्या वतीने मान्यवरांचे आणि शिक्षकांचे यथोचित सत्कार करण्यात आले. तसेच माजी विद्यार्थ्यांचे ही संस्थेच्या वतीने शिक्षण समिती सदस्य डॉ श्री राजशेखर येळीकर सरांच्या हस्ते भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.तसेच माजी विद्यार्थी श्री अमित भाईकटी, श्री केदार पंचे श्री अभयसिंह देशमुख,सौ सुचेता कुरलें पाटील, श्री अजित कदम, श्री वैभव पिंपळे, श्री सादिक पठाण यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच सर्व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे शिक्षण समिती सदस्य डॉ श्री राजशेखर येळीकर यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एन विजया, सौ डॉ योगीनी सोरेगावकर पाटील आभार डॉ सौ नाजनीन मुजावर पेंढारी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता हुरडा पार्टी आणि सुरूची भोजनानी झाली.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!