वडगाव आनंद :

नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणांंच्या बाबतीत चर्चेत असणाऱ्या श्रीमती रेऊबाई बाळाजी विद्यालय, वडगाव आनंद या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी या वर्षी देखील मागील २८ वर्षांच्या यशाची सीमा पार करत महाराष्ट्र राज्यात व पुणे जिल्ह्यात यशाचे मानकरी ठरत या विद्यालयाची विद्यार्थीनी कु.मानसी भाऊसाहेब सप्रे हिने २६२ गुण मिळवून राज्याच्या गुणवत्ता यादीत ९ वे स्थान पटकावले आहे, तर इतर ६ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत आपले स्थान कायम करत त्यात कुमार श्रेयस संतोष गगे (२४८ गुण), कुमारी साक्षी संतोष कालेकर (२२० गुण), कुमार ओमकार गुलाब घंगाळे (२०४ गुण), कुमारी साक्षी राजीव आवरी (१९८ गुण), कुमार श्रेयस पोपट नरवडे (१९६ गुण) कुमार वेदांत गणेश देवकर (१९२ गुण) याप्रमाणे भरघोस असे गुण मिळविले आहेत. या शाळेने गेली २८ वर्षे या परीक्षा स्पर्धेत वेगवेगळ्या प्रकारे यश मिळवत आपले गुणांकन राखण्याचे काम केलेले आहे, यासाठी या शाळेतील शिक्षक रात्रंदिवस मेहनत करत विद्यार्थ्यांना मार्गदशन करत असतात. त्यात विशेष असे मार्गदर्शन श्री.अंकुश घाडगे सरांचे असून त्यांना नेहमीच सहकार्य करणारे त्यांचे सर्व सहकारी देखील असतात. तसेच मार्गदर्शक मुख्याध्यापिका सौ.रजनी डुंबरे, श्री.बबन मुंढे, श्री. अंकुश घाडगे, सौ.मंगल घाडगे आदी शिक्षक, संस्थेचे अध्यक्ष श्री.उल्हास देवकर या सर्वांचे मार्गदशन या मुलांना मिळाले आहे.

या मुलांचा कौतुक सोहळा शाळेच्या वतीने आयोजित केला असता या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी पंचायत समिती, जुन्नर कार्यालयाच्या विस्तार अधिकारी (शिक्षण) सौ.मंगल डुंबरे या होत्या तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव आनंद या शाळेचे शिक्षणतज्ञ सदस्य, सामाजिक कार्यकर्ते श्री.डी.बी.नाना वाळूंज हे होते. कार्यक्रमादरम्यान शिक्षक व मुलांनी घेतलेली मेहनत हीच या यशाची गुरुकिल्ली ठरली असे मत सौ.डुंबरे यांनी व्यक्त केले तर विशेष अतिथी यांनी श्री.अंकुश घाडगे सरांचे कौतुक करत गेली २८ वर्षे शाळेला यशाचा बहुमान मिळवून देण्यात श्री.अंकुश घाडगे सरांचा सिंहाचा वाटा असून असून असे शिक्षक जिल्ह्याच्या आदर्श शिक्षक पुरस्करापासून वंचित का राहिले याबाबत खंत व्यक्त करत, येणाऱ्या स्पर्धेत सरांनी सहभाग नोंदवावा अशीही विनंती या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली. या कार्यक्रमास ग्रामस्थ देखील मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन श्री. अमोल जावळे यांनी केले

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!