उदापूर :-
उदापूर बल्लाळवाडी रोहोकडी या तीन केंद्राच्या बीटस्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.स्पर्धेचे उद्घाटन मा.अंकुशशेठ आमले मा.सदस्य जि.प.पुणे यांच्या शुभहस्ते झाले.प्रास्ताविकात केंद्रप्रमुख मंगल डुंबरे यांनी विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासाबरोबर शारिरिक विकास देखील महत्वाचा आहे असे सांगितले. याप्रसंगी सरपंच सचिन आंबडेकर, प्रभाकर शिंदे अध्यक्ष विद्या विकास मंडळ , बबनदादा कुलवडे, अध्यक्ष ग्रामविकास मंडळ ,पराग जगताप अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त गावसमिती , पत्रकार दै.सकाळ , शिवाजी डुंबरे विस्ताराधिकारी बीट ओतूर जयश्री अमूप उपसरपंच,चैत्राली शिंदे, विनोद भोर सदस्य ग्रा.पं.उदापूर अर्जुन अमूप अध्यक्ष शालेय व्यव समिती, स्वप्नजा मोरे, सविता कु-हाडे, माणिक फापाळे, डॉ पुष्पलता शिंदे, विजय कु-हाडे, शिवाजी अस्वार सर मुख्याध्यापक सरस्वती विद्यालय उदापूर आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मा.अकुंश आमले सद्स्य जि.प.पुणे यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना खेळातील हार जीत पेक्षा आपला आत्मविश्वास उंचवावा जेणेकरून आपण ध्येयाप्रत निश्चित वाटचाल करू असे सांगितले.
विजयी स्पर्धकांना शुभांगीताई होनराव यांच्या शुभहस्ते ट्राॅफी प्रशस्तीपत्रक मेडल गुलाबपुष्प देऊन सन्मनित करण्यात आले.सर्व स्पर्धकांना ट्राॅफी सौजन्य मे संतोषकुमार अप्पाशेठ होनराव आडतदार कृ.उ.बाजार समिती ओतूर व प्रशस्तीपत्रक सौजन्य चाईल्ड केयर फाऊंडेशन व चैतन्य मेडिकल ओतूर यांनी केले. पंच म्हणून सरस्वती विद्यालयाचे शिक्षक हाडवळे सर, नेहे सर, झावरे सर, कोंढार सर व माळवे मॅडम यांनी उत्तम काम केले.स्पर्धायशस्वी होण्यासाठी नितीन शिंदे, दिनेश कुलवडे, भानुदास बटवाल, सुनिल ढमाले, कैलास सुपे, भास्कर कोकतरे, समीर कुमकर, प्रदीप दिघे, सुनिल हांडे, भगवान रेंगडे, सुजाता मंडलिक, राजेंद्र गारे, सत्यवान मस्के योगिता सूर्यवंशी, नंदिनी बेनके, अभिलाषा बोडके, ललिता बरबडे यांनी योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रभाकर दिघे यांनी कले तर आभार सुनिल डबीर यांनी मानले.
स्पर्धानिहाय विजयी विद्यार्थी-

५० मी.धावणे मुले- प्रथम –अमित सुनील घोगरे ( आलमे) व्दितीय – आयुष संतोष माळवे ( उदापूर), तृतीय – सुरज संतोष शिनगारे ( ओतूर नं १)
५०मी धावणे मुली- प्रथम –मनस्वी मच्छिंद्र वाघ ( ओतूर नं २), व्दितीय – योगिता गोरक्षनाथ शिंदे ( कुलवडेमळा), तृतीय – पूर्वा सुहास घोगरे ( आलमे)
१०० मी धावणे मुले प्रथम- शुभम सुभाष दुधवडे ( आलमे), व्दितीय- आनंद विक्रम बनकर ( माळवाडी)
१०० मी धावणे मुली प्रथम – मानसी भानुदास बटवाल ( माळवाडी), व्दितीय – अमृता शिवाजी घोगरे ( आलमे)

धावती उंचउडी मुले लहानगट-प्रथम – रोहन नारायण जाधव (ओतूर नं १) व्दितीय- अजित गणेश ढमाले ( ढमालेमळा) तृतीय – प्रकाश कैलास पारधी ( आलमे)
धावती उंच उडी मुली लहानगट- प्रथम – मनस्वी मच्छिंद्र वाघ ( ओतूर नं २), द्वितीय – श्रावणी सचिन बनकर ( माळवाडी), तृतीय – पूर्वा सुःअस घोगरे ( आलमे)
धावती उंच उडी मुले (मोठा गट) प्रथम – शुभम सुभाष दुधवडे ( आलमे) व्दितीय – निशिकांत वाळीबा चौधरी ( माळवाडी)
धावती उंच उडी मुली (मोठा गट) प्रथम – सिद्धी नवनाथ पवार ( माळवाडी) व्दितीय – अनुष्का अशोक हांडे ( आलमे)
लांब उडी लहानगट मुले प्रथम- स्वाधीन सर्जेराव पवार ( बल्लाळवाडी), व्दितीय – अनिकेत देवराम धनगर ( ओतूर नं १) तृतीय – अथर्व राजेंद्र रजपूत ( उदापूर)
लांब उडी लहनगट मुली प्रथम – श्रावणी सचिन बनकर ( माळवाडी), व्दितीय – पूर्वा सुहास घोगरे ( आलमे) तृतीय – आराध्या मयूर गिते ( ओतूर नं २)
लांब उडी मोठा गट मुले प्रथम – शायराज संदीप चौधरी (आलमे), व्दितीय –आनंद विक्रम बनकर ( माळवाडी)
लांब उडी मोठा गट मुली प्रथम – आराधना अनिल फोडसे शाळा (आलमे) व्दितीय –वैष्णवी मच्छिंद्र पवार ( माळवाडी)
गोळाफेक मुले प्रथम प्रथम – आनंद विक्रम बनकर (माळवाडी), व्दितीय – विराज सोपान घोगरे ( आलमे)
गोळाफेक मुली प्रथम – भूमी प्रवीण फोडसे (आलमे), व्दितीय – मानसी भानुदास बटवाल ( माळवाडी)
थाळी फेक मुली प्रथम – भूमी प्रवीण फोडसे (आलमे), व्दितीय – मानसी भानुदास बटवाल ( माळवाडी)
थाळी फेक प्रथम मुले प्रथम- विराज सोपान घोगरे (आलमे) व्दितीय –समर्थ संदीप घोगरे ( आलमे)

लोकनृत्य लहानगट प्रथम ओतूर नं.२
लोकनृत्य मोठा गट प्रथम शाळा आलमे.
खो खो लहानगट मुले मुली प्रथम शाळा आलमे.
खोखो मुले मुली प्रथम आलमे.
कबड्डी मुली प्रथम आलमे
कबड्डी मुले प्रथम माळवाडी.
लेझीम लहानगट मुली प्रथम डिंगोरे
लेझीम लहानगट प्रथम मुले ओतूर नं.१
भजन लहानगट प्रथम ओतूर नं १ व्दितीय – कुलवडेमळा
वक्तृत्व लहान गट प्रथम – जीकरा शेख ( ठिकेकरवाडी) व्दितीय – योगिता गोरक्षनाथ शिंदे ( कुलवडेमळा) तृतीय – शौर्य योगेश उकिर्डे ( डिंगोरे)
वक्तृत्व मोठा गट प्रथम तन्मय भोर ( माळवाडी) व्दितीय – युवराज राउत ( आलमे)
प्रतिनिधी :- दुष्यंत बनकर
