उदापूर :

डिंगोरे येथील सरपंच सौ सीमा रमेश सोनवणे व त्यांचे सहकारी उपसरपंच निलेश लोहोटे यांनी मागील वर्षी सरपंच व उपसरपंच पदाला येणारे मानधन गावच्या विकासासाठी देऊन इतर सरपंचांपुढे एक आदर्श ठेवला होता याच केलेल्या कार्याची दखल घेत राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने सरपंच रत्न तसेच ग्रामरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.


यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अतुलजी सावे सहकार इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य हे लाभले होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार बच्चुभाऊ कडू, आमदार दिलीप वळसे पाटील, बाळाभाऊ भेगडे, प्रकाश धारीवाल, खासदार अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भगवान रामचंद्र श्रीमंदिलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


त्याचबरोबर जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बबनराव तांबे, योगेश आमले युवा उद्योजक, जालिंदर उकिरडे, राजेंद्र सुकाळे, निलेश लोहोटे, रघुनाथ लोहोटे, विष्णू शेरकर, विश्वासराव आमले, मनोहर लोहोटे, तान्हाजी लोहोटे, सभाजी नाना लोहोटे, डी एम लोहोटे ग्रामपंचायत सर्व सदस्य ,अंकुश थापेकर, गणेश उकिरडे, संदीप शिंगोटे, एकनाथ शिंगोटे, राजेंद्र लोहोटे, ग्रामसेवक थोरात भाऊसाहेब,समस्त ग्रामस्थ डिंगोरे यांनी देखील सरपंच सीमा सोनवणे यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिनिधी :दुष्यंत बनकर

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!