उदापूर,जुन्नर:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,पाथरटवाडी येथील उपशिक्षिका सौ. संगिता अजित पानसरे यांना पंचायत समिती जुन्नर यांचे वतीने नुकताच गुणवंत शिक्षिका पुरस्काराने गौरवले गेले.
संगीता पानसरे आणि त्यांचे सहकारी प्रभाकर दिघे सर यांनी या शाळेला प्रथम सभापती चषक मिळवून दिलेला आहे. प्रगत शाळा, नाविन्यपूर्ण उपक्रम, पाढे पाठांतर, कोरोना काळात सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण, गुणवत्ता वाढीसाठी जाणीवपूर्वक सातत्याने प्रयत्न, लोकसहभाग या सर्व गोष्टींमुळे त्यांना हा पुरस्कार तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या शुभ हस्ते नुकताच प्रदान केला गेला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, माजी सदस्य अंकुश आमले, गुलाब पारखे, मोहित ढमाले, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी,गटशिक्षणाधिकारी सौ.अनिता शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत गरिबे ,विस्तार अधिकारी सुचिता अभंग, रघुनाथ पवार, शिवाजी डुंबरे, विष्णू धोंगडे, केंद्रप्रमुख संजय जाधव, शिक्षक भारतीचे जिल्हा संघटक नितीन शिंदे, मंगल डुंबरे, आशा धांबोरी, बाळासाहेब भालेकर, सरपंच गीता पानसरे, सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उप भूस्थित होते.

संगीता पानसरे यांच्या या निवडी बद्दल केंद्रप्रमुख मंगल डुंबरे आणि पाथरटवाडी जिल्हा परिषदेच्या स्थानिक व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

 

प्रतिनिधी :- फैयाज इनामदार

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!