उदापुर ,जुन्नर:-
ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित सरस्वती विद्यालय, उदापुर ता.जुन्नर च्या इयत्ता ५वी ते १०वी मधील विद्यार्थ्यांना आकाश कंदील व पणती बनविणे
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती या विद्यालयाच्या चित्रकला शिक्षक रोहिणी घाटकर यांनी दिली.
या कार्यशाळेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन रोहिणी घाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आकर्षक आकाश कंदील व पणत्यांची कलाकृती निर्माण करून उत्तम प्रतिसाद दिला.विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना आधिक पारंगत करून त्यांच्यातील सृजनशीलता विकसनशील बनवावी व सकारात्मक दृष्टिकोन वाढवा, जीवन जगणे सुंदर व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्लास्टिक व थर्माकोल स्वतः वापरणार नाही व इतरांना वापर करून देणार नाही अशी प्रतिज्ञा करून एक देशसेवा आदर्श निर्माण केला आहे. या कार्यशाळेत कला शिक्षक रोहिणी घाटकर यांनी विद्यार्थ्यांना प्रथम मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून विविध प्रकारचे व आकाराचे रंगीबेरंगी आकाश कंदील कसे तयार होतात तसेच सप्त रंगाचा वापर करून पणत्या कशा सुबक बनविले जातात याचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
शालेय अभ्यासक्रम न बुडविता सुट्टीच्या म्हणजे रविवारी घेतलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी अनेक रंगीबेरंगी कागदांचा,वेगवेगळे मणी, लाकडी काड्या,दोरा,डिंक अशा टाकाऊ वस्तू वापर करून टिकाऊ वस्तूंची निर्मिती केली.
या कार्यशाळेस मुख्याध्यापक शिवाजी अस्वार, संजय हिरे,यांनी भेट देऊन सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.
प्रतिनिधी:-दुष्यंत बनकर
