आळेफाटा (वार्ताहर) :
गोल्डन बेकरी गेल्या 40 वर्षांपासून ग्राहकांना अविरत सेवा देत असून आजतागयात एकाही ग्राहकाची तक्रार नसून पहिल्यांदाच गोल्डन बेकरी प्रशासनाला बदनाम करण्याच्या हेतूने सुडबुद्धतीने तक्रार दाखल केली असल्याबाबतचा निर्वाळा बेकरी मालक जावेद अन्सारी यांनी केला. संबंधित तक्रारदार हे बेकरी मध्ये स्वतः खरेदीसाठी आलेले नसून मुख्य तक्रारदार रोहिणी निमसे यांच्या संबंधित हकिकतीला अनुसरून त्यांनी उपलब्ध नमुनाच्या अनुषंगाने अपुऱ्या माहितीच्या आधारे तक्रार दाखल केलेली आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकारी राहुल खंडागळे यांनी बेकरीमधील खाद्यपदार्थ नमुने स्वतः जमा करून अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तपासणीसाठी दिलेले आहे. एफ डी आय इन्स्पेक्टरचा जो अहवाल येईल तो आम्हाला मान्य असेल. त्यांनतर पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगितले. सहायक आयुक्त अन्न व प्रशासन विभाग गवते यांनी परवाना निलंबित केल्याचा कोणताही आदेश पत्रद्वारे प्राप्त झाला नसलेबाबतचे बेकरी मालक जावेद अन्सारी यांनी खुलासा केला. बेकरीमध्ये कोणताही 18 वर्षाखालील कर्मचारी कार्यरत नसून सर्व कामगारांना ऍप्रॉन युनिफॉर्म, हॅन्ड ग्लोज, डोक्यातली केस खाद्यपदार्थ मध्ये पडू नये यासाठी प्लास्टिक कॅप अशा सर्व प्रकारची काळजी घेत जात असल्याची माहिती दिली.
बेकरीच्या अंतर्गत परिसरातही स्वच्छता ठेवली जात असल्याबाबतची माहिती देत गोल्डन बेकरी प्रशासनावर झालेल्या सर्व आरोपांचे खंडण केले. 200 डिग्री भट्टीच्या तापमानात रोट भाजल्यावरही त्यात अळ्या कशा जिवंत राहू शकतात?? हा देखील संशोधनाचा विषय असल्याचे सांगितले. शिवाय बेकरीमध्ये तयार झालेला माल 1 ते 2 दिवसांत दैनंदिन आळेफाटा पंचक्रोशीतील हजारो ग्राहकाना विक्री होत असल्याने आमच्याकडे मालाचा स्टॉक केला जातं नसल्याचे बेकरी मालक जावेद अन्सारी यांनी नमूद केले. सर्व माल अन्न व औषध प्रशासनाने नेमून दिलेल्या नियमांच्या अधीन राहूनच त्याची निर्मिती व विक्री केली जातं असल्याची माहिती दिली.
वार्ताहर – मनिष गडगे