पुणे :
दि ११/०१/२४ पुणे रुग्ण हक्क संघर्ष समिती च्या वतीने पुणे शहर व जिल्ह्याभर होत असलेली हातभट्टी दारू ची अवैध धंदे बंद करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.पुणे शहर व परिसरात ग्रामीण भागात अनेक हाॅटेल्स व झोपडपट्टी परिसरात विनापरवाना मद्य विक्रीचे प्रमाण वाढले आहे याला भ्रष्ट अधिकारी जबाबदार आहेत. स्वस्त व रसायन मिश्रीत हातभट्टी ही सहज मिळत असल्या कारणाने मद्यपीचे वाढते प्रमाण यात शहरी व ग्रामीण भागात झोपडपट्टी परिसरात अवैध हातभट्टी दारू विक्री सर्रास चालू आहे व पिणार्यांचे प्रमाण वाढले आहे या स्वस्त व रसायन मिश्रीत दारू मूळे प्रत्यक्ष लिवरवर परिणाम होत असल्याने रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यात कमी वयाचे मुलांचे व तरुणांचे प्रमाण जास्त आहे यातून गुन्हेगारी व रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून तरुण पिढी बरबाद होत आहे, अनेक संसार उद्धवस्त होत आहेत या कडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रुग्ण हक्क संघर्ष समिती प्रमुख ॲड विजयभाऊ पंडित यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला व संपूर्ण पुणे शहर व जिल्ह्याभर होत असलेल्या अवैध अनेक हाॅटेल्स मध्ये विनापरवाना होत असलेली हातभट्टी दारू विक्री याला आळा बसावा व वाढती गुन्हेगारी व रुग्णांचे प्रमाण याला आळा बसावा म्हणून निवेदन देण्यात आले यावेळी रुग्ण हक्क संघर्ष समिती शहराध्यक्ष संजय बावळेकर, प्र.संघटक किरण बडे, सल्लागार कानिफनाथ पोले व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी होते.
