पुणे :-

महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छननी केली जात आहे. या छननीत अनेक अर्ज अपात्र ठरत आहेत. पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत १० हजार बहिणी अपात्र ठरल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू करण्यात आली. त्यात विविध त्रुटींमुळे बहिणी अपात्र ठरत असल्याचे दिसून येत आहे.लाडकी बहीण योजनेत उत्पन्नाची अट अडीच लाख रुपये आहे. तसेच लाभार्थींनी अन्य शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा, ही अट आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अटींचे पालन झाले की नाही, त्याची छाननी रखडली होती.

पुणे जिल्ह्यातील २० लाख ८४ हजार अर्जदारांना योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाने दिली. योजनेसाठी १५ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यातून २१ लाख ११ हजार ३६३ मंजूर करण्यात आले होते. अजूनही १२ हजार अर्जाची छाननी बाकी आहे. आतापर्यंत ९ हजार ८१४ अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत. तसेच ५ हजार ८१४ अर्जामध्ये किरकोळ त्रुटी सापडल्याने तात्पुरते नाकारण्यात आले आहेत.

अपात्रांकडून पैसेही परत

लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थी अपात्र ठरत आहेत. त्या अपात्र लाभार्थ्यांनी पैसे देखील परत केले आहेत. तसेच अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिली.

या निकषांची पडताळणी

लाडकी बहीण योजनेत उत्पन्नाची अट अडीच लाख रुपये आहे. तसेच लाभार्थींनी अन्य शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा, ही अट आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अटींचे पालन झाले की नाही, त्याची छाननी रखडली होती. विधानसभा निवडणुकीनंतर अपात्र लाभार्थ्यांवर राज्यभरात कारवाईसुद्धा सुरु झाली आहे. तसेच यापुढेही अर्जांची पडताळणी सुरुच राहणार असल्याचे महिला व बालकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती. या योजनेमुळे महायुतीला मोठा कौल राज्यातील जनतेने दिला. भाजपने सर्वाधिक १३२ जागा मिळवल्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. महायुतीला २३० जागा मिळाल्या. तसेच आता काही अपक्ष आमदारही महायुतीसोबत आले आहेत.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!