आळेफाटा वार्ताहर :
महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या जुन्नर तालुकाध्यक्षपदी सुधाकर सैद यांची फेरनिवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी मंदार अहिनवे आणि विजय बोंबले, सचिवपदी किशोर वारुळे यांची तर कार्याध्यक्षपदी मनिष गडगे यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी (दि. ३) नारायणगाव (ता. जुन्नर) येथे झालेल्या बैठकीत जुन्नर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे मार्गदर्शक संदीप खळे, राज्याध्यक्ष डॉ. समीर राजे, समर्थ भारत माध्यम समूहाच्या संपादिका स्नेहा बारवे, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र वायकर, जेष्ठ पत्रकार सचिन भोर, माजी कार्याध्यक्ष बाबाजी टाकळकर, महेश घोलप, दुष्यंत बनकर, मनोहर हिंगणे, सुदर्शन मंडले आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे राज्यभरात तब्बल ८५०० पेक्षा जास्त सदस्य असून जुन्नर तालुक्यातही मोठे संघटन आहे. पत्रकार बांधवांच्या हक्क, अधिकार, प्रशिक्षण आणि हितसंवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ राज्यभरात कार्यरत आहे. यावेळी झालेल्या बैठकीत संदीप खळे यांनी पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले तर राज्याध्यक्ष यांनी पत्रकार महासंघाच्या धोरणांवर प्रकाश टाकला. या बैठकीचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुधाकर सैद यांनी केले तर जेष्ठ पत्रकार सचिन भोर यांनी आभार मानले.तसेच आळेफाटा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाची नियोजन समिती व कार्यकारिणी समिती, संघटक, संपर्काप्रमुख अशी विविध पद नियुक्ती करण्यात आली. नियोजन समिती अध्यक्षपदी महेश घोलप, उपाध्यक्षपदी चंद्रकांत औटी, सचिवपदी डॉ जालिंदर वाजे, सदस्यपदी सुदर्शन मंडले, राहुल तांबे यांची नियुक्ती करण्यात आली. तर कार्यकारी समिती अध्यक्षपदी मनोहर हिंगणे, उपाध्यक्षपदी मिथुन मोजाड, नितीन शेळके यांची नियुक्ती करण्यात आली. सचिव पदी विशाल वायकर, सहसचिवपदी दुष्यंत बनकर तर सदस्यपदी सहदेव पाडेकर, सागर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. संघटकपदी जितेंद्र पुराणिक, सौरभ चौधरी, कोषाध्यक्षपदी बाबाजी टाकळकर यांची नियुक्ती करण्यात आली.सर्वच सभासदांच्या नियुक्तीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले.

पत्रकारांनी बातमी देताना विशेष काळजी घेऊन निष्पक्षपणे काम करने आवश्यक आहे. पत्रकारिता ही एक मोठी जबाबदारी आहे. समाजाचा घट करू पाहणाऱ्या अपप्रवृत्तींना थोपविण्याचे सामर्थ्य असणारी लेखणी ही सदैव समाजहितासाठी झिजली पाहिजे तरच लोकशाही अबाधित राहील. – संदीप खळे, मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ
महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या जुन्नर तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मला पुन्हा एकदा सर्वांनी अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली त्या बद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. – सुधाकर सैद, अध्यक्ष, जुन्नर तालुका

जुन्नर तालुक्यातील तब्बल 35 पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन तालुक्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाची एक सकारात्मक प्रतिमा निर्माण केली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या जुन्नर तालुका कार्यकारिणी आणि सर्व सदस्यांना पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा. – डॉ. समीर राजे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ
महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ , जुन्नर नवनिर्वाचित कार्यकारणी मंडळ २०२३/२०२४
अध्यक्ष : सुधाकर सैद
सचिव: किशोर वारुळे
उपाध्यक्ष: विजय बोंबले
उपाध्यक्ष: मंदार अहिनवे,कार्याध्यक्ष: मनिष गडगे
कोषाध्यक्ष: बाबाजी टाकळकर ,संपर्क प्रमुख: सुनिकेत बटवाल , प्रसिध्दी प्रमुखः रामकृष्ण भागवत
सह सचिव: केतन ताम्हाणे
कायदेशीर सल्लागार: अॅड. गौरव रोकडे
संघटक: जितेंद्र पुराणिक
संघटक: सौरभ चौधरी
नियोजन समिती
अध्यक्ष: महेश घोलप
उपाध्यक्ष: चंद्रकांत औटी
सचिव: डॉ जालिंदर वाजे
सदस्य: सुदर्शन मंडले
सदस्य: राहुल तांबे
कार्यकारी समिती
अध्यक्ष: मनोहर हिंगणे
उपाध्यक्ष: मिथुन मोजाड
उपाध्यक्ष: नितीन शेळके
सचिव: विशाल वायकर
सहसचिव: दुष्यंत बनकर
सदस्य: सहदेव पाडेकर
सदस्य: सागर जगताप
