आळेफाटा (वार्ताहर)
वडगाव आनंद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रामपंचायत वडगाव आनंद सभागृह व बौद्ध विहार येथे ग्रामपंचायत सरपंच रेलिका जाधव व ग्रामपंचायत सदस्य, बौद्ध बांधव, ग्रामस्थ यांच्या मोठ्या उपस्थितीत अभिवादन सभा संपन्न झाली. यावेळी श्री समर्थ रामदासबाबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष कैलास वाळुंज, माजी सरपंच सुरेश शिंदे, विद्यमान नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य गणेश भुजबळ, बारकू गडगे, सोमनाथ गडगे, वैशाली संजय देवकर, निशा वाळुंज, अर्चना काशिकेदार, गोमाता दुग्धसंस्था अध्यक्ष गणेश वाघमारे, नवनाथ वाळुंज, सचिन देवकर, अरुण जाधव, संदेश काशिकेदार, नितीन काशिकेदार, तलाठी आकाश काशिकेदार, बौद्ध बांधव, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. यावेळी संदेश काशिकेदार यांनी अभिवादन सभेचे प्रास्तविक, सूत्रसंचालन केले.

यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व मूर्तीस पुष्पहार व पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी सरपंच रेलिका जाधव, गणेश वाघमारे, नवनाथ वाळुंज, आकाश काशिकेदार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त प्रातिनिधीक स्वरूपात अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री समर्थ रामदासबाबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष कैलास वाळुंज, शिवछत्रपती विद्यालय शालेय समिती उपाध्यक्ष सोमनाथ गडगे, ग्रा पं सदस्य बारकू गडगे, माजी सरपंच सुरेश शिंदे, पत्रकार मनिष गडगे यांना संविधानाच्या प्रती भेट स्वरूपात भेट देण्यात आल्या.
