साळवाडी :

साळवाडी (बोरी) तालुका जुन्नर येथील कुकडी नदीमध्ये पुलाच्या पायथ्याशी काही मृत कोंबड्यांचे अवशेष टाकल्याचे प्रकार समोर आला आहे.साळवाडी गावाजवळून वाहणाऱ्या कुकुडी नदीच्या पात्रात अज्ञातांनी मृत कोंबड्यांचे अवशेष टाकल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.

यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बोरी परिसरात चिकन ची तीन ते चार दुकाने असून या दुकानदारांपैकी कोणी प्रकार केला आहे का याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.याच नदीमधील पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशाप्रकारे मृत कोंबड्यांचे अवशेष नदी पात्रात टाकल्याने संताप व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी:-
राजेंद्र भोर

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!