पैठण :

छत्रपती संभाजी नगर पैठण तालुक्यातील बिडकीन येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय ॲम्बुलन्स १०८ रुग्णवाहिका अत्यावश्यक सेवा गेली अनेक दिवसांपासून कोनत्या न कोणत्या कारणाने बारगळत असून वेळेवर रुग्णांना सेवा मिळत नाही बिडकीन येथील ॲम्बुलन्स इमर्जन्सी सेवा देणारे डॉक्टर एस एन शेख यांचे ग्रामीण रुग्णालया पासून अडीज ते ३ किमी अंतरावर फारोळा येथे प्रायव्हेट क्लिनिक आशा हॉस्पिटल या नावाने आहे ते बिडकीन घाटी रुग्णालयात ॲम्बुलन्स इमर्जन्सी डॉक्टर या पदावर कार्यरत असून ॲम्बुलन्स डाक्टर व चालक ॲम्बुलन्स क्रं M H 14. CL.0717 ही स्वतंत्र स्व मालकीची असल्या सारखी वापर करताना दिसत आहे बिडकीन शासकीय रुग्णालय येथे ॲम्बुलन्स घेऊन थाबण्या आयवजी आशा हॉस्पिटल फारोळा पैठण रोडवर ऑनड्युटी आपल्या स्वतःच्या हॉस्पिटल समोर घेऊन थांबतात गेली अनेक दिवसांपासून हा प्रकार चालू असून याकडे वैद्यकीय वरीष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने जनतेची दिशाभूल होत आहे शासकीय रुग्णालय येथे येणार्या एमर्जन्सी रुग्णांना वेळेवर सुविधा मिळत नाही तासंतास थांबून नाईलाजाने पेशंट व नातेवाईकांना प्रायव्हेट वाहन शोधावे लागते रुग्णांना २४ तास सेवा १५ ते २० मिनिटांतच रुग्णवाहिका उपलब्ध झालीच पाहिजे असा नियम आहे परंतु शासकीय घाटी रुग्णालय ॲम्बुलन्स डॉक्टर व ड्रायव्हर हे मनमानी कारभार करत असून छत्रपती संभाजी नगर जिल्हा वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी व बिडकीन वैद्यकीय अधिकारी यांनी डॉक्टर एस एन शेख यांच्या मुळे अत्यावश्यक ॲम्बुलन्स सेवा देण्यास जनतेची गैर सोय होत असल्याने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन शासकीय रुग्णवाहिका रुग्णालयातच थांबल्या गेली पाहिजे असे नियोजन करणे गरजेचे आहे

मधुकर बर्फे
प्रतिनिधी

 

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!