आळेफाटा (वार्ताहर):

इम्रानभाई मनियार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमामार्फत उत्साहात साजरा करण्यात आला. इम्रानभाई मनियार हे आळे, आळेफाटा मधील सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती त्यांच्या आयुष्यात अडी अडचणीतुन वाट काढत आजवरचा प्रवास करत आहे. त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की माझा वाढदिवस नसुन माझ्या आयुष्यातले दिवस कमी होत चालले आहे व येथून पुढील जीवन हे कुटुंबांसाठी, समाजासाठी, गावाच्या विकासासाठी अर्पित केलेले आहे. त्यांनी आजवरचे समाज कार्य आळे गावचे मंहात्मा गांधी तंटामुक्ती उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहन खरदी विक्री संघटना पुणे जिल्हा उपाध्यक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र आळे सदस्य, आळे वि. का सोसायटी दक्षता कमिटी सदस्य, श्रीराम नागरी पतसंस्था सल्लागार, उर्स कमिटी चे उपाध्यक्ष अशा विविध संस्थामध्ये कामे करून गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला व यापुढील काळात ही असेच समाजकार्य सुरु ठेवणार असल्याचे सांगितले. दरवर्षी वाढदिवसाचा खर्च टाळून आळे, आळेफाटा, राजुरी, बेल्हा, ओतुर नारायणगाव ह्यामधील जिल्हा़ परिषद शाळा, उर्दू शाळा व अंगणवाड्या यांना शालेय साहित्य वही, पेन, खाऊ वाटप करून करतात. त्यात गावतील मुस्लिम कब्रस्थान मध्ये समुपदेशकचे फलक लावण्यातयेणार असल्याचे सांगितले.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!