आळेफाटा (वार्ताहर)

दिवसेंदिवस शेतीतून जास्त उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खते व औषधांचा वापर वाढत आहे.परंतु अशा उत्पन्नाचा मनुष्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे विशेषतः तरुण शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करताना जैविक खते व औषधांचा वापर करावा असे मत कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांनी व्यक्त केले.


जुन्नर येथील पंचायत समितीच्या जिजामाता सभागृहात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून डायमाईन्स अँड केमिकल लिमिटेड, एम.एन. मेहता चॅरिटेबल ट्रस्ट व भारत कृषी सेवा संस्थेच्या सहकार्याने शेतकऱ्यांना मोफत औषध फवारणी बॅटरी पंप व जैविक औषध किट वाटप कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल तात्या मेहेर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.


याप्रसंगी जुन्नर तालुक्यातील जवळपास पन्नास शेतकऱ्यांना औषध फवारणी साठी लागणारे बॅटरीपंप व पंच्याहत्तर शेतकऱ्यांना जैविक औषधाचे किट मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटण्यात आले.या कार्यक्रमास कृषीरत्न अनिल तात्या मेहेर, अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष कृषीभूषण श्रीराम गाढवे, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक कृषीभूषण जितेंद्र बिडवई, भारत कृषी सेवा संस्थेचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट वीरभद्र गोगे, आर एन डी ऑफिसर डॉक्टर शुभांगी नारकर, ग्रामउर्जा स्वराज पंचायत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ठिकेकर वाडीचे आदर्श सरपंच संतोष ठीकेकर, ऍग्रो सोल्युशन्स कंपनीचे अनिल बिराडे, मंडल कृषी अधिकारी डी. एस.जाधव, कृषी अधिकारी बाप्पू रोकडे, विठ्ठलवाडीचे सरपंच आदिनाथ चव्हाण, डिसेंट फाऊंडेशनचे सचिव एफ.बी. आतार, नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ डॉक्टर दत्ता गावडे, लेण्याद्री देवस्थानचे विश्वस्त जयवंत डोके, सदाशिव ताम्हाणे, सुरेश वाणी, प्रकाश नवले, अजित चव्हाण, दिलीप भगत, योगेश वाघचौरे आदी मान्यवर व शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र बिडवई यांनी तर सूत्रसंचालन फकीर आतार यांनी केले.आदिनाथ चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.यावेळी एक देश एक सेवा “भारत कृषी सेवा” असा नारा देण्यात आला.

भारत कृषी सेवाचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट विरभद्र गोगे बोलताना म्हणाले की,
भारत कृषी सेवेचे सर्वेसर्वा महिला कार्यकारी संचालक तथा सीईओ शरयू लांडे मॅडम आणि कंपनीचे कार्यकारी संचालक हेमंत ढोले पाटील हे शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात असे सांगितले.

भारत कृषी सेवा हे अँड्रॉइड मोबाईल वरील एक अप्लिकेशन असून त्यामार्फत शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन सॅटेलाईट शेती पाहणी आणि त्याचे पीक मार्गदर्शन, हवामान बदलाची दैनंदिन माहिती,पीक लागवड,शेतीमालाला उपलब्ध बाजारपेठ त्यांचे बाजारभाव,तसेच पिकांवर फवारणी करण्यासाठी विविध कीटकनाशके, पेस्टी साईड्स,फर्टिलायझर याची सर्वसमावेशक माहिती तसेच ऑनलाईन द्वारे त्याची घरपोच सुपर फास्ट डिलिव्हरी याची विशेष सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.प्रत्येक शेतकऱ्यांने निश्चित आपल्या मोबाईल मध्ये भारत कृषी सेवा हे मोबाईल अँप्स डाऊनलोड करून सर्व कृषी सेवेचा लाभ घ्यावा.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!