पुणे :
केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास व्हावा. महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी वेळोवेळी विविध सरकारी योजनांची सुरुवात करते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव Gai Gotha Anudan Yojana आहे.
गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते
आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई, म्हशी, शेळी, कोंबड्या असतात पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाच ठिकाण नसत त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस यांच्यापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात व त्याच्यासमोर जनावरांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला गाय गोठा अनुदान योजना हि अत्यंत उपयुक्त ठरते.
या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवाना गाय, म्हशी, शेळी, कोंबड्या यांना पक्क्या स्वरूपाचा गोठा व शेड बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नाही परिणामी त्यांना स्थलांतर करून नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी वास्तव्यास जावे लागते त्यामुळे त्यांचे स्थलांतर रोखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून हि योजना राबविण्यात येत आहे. केंद्राच्या मनरेगा योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार देखील या योजनेशी जोडला जाणार आहे.
वाचकांना विनंती
आम्ही गाय गोठा अनुदान योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी शेतकरी व पशुपालक असतील जे गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
गाय गोठा योजनेचा उद्देश
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे व त्यांना समृद्ध करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून गाय म्हैस गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
- शेतकऱ्यांच्या जनावरांचे ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण करणे हा गाय गोठा अनुदान योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा योजनेचा एक प्रमुख उद्देश्य आहे.
- शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
- शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणे.
- शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे.
- नागरिकांना जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा एक उद्देश्य आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी तसेच शेड बांधण्यासाठी आर्थिक तंगी चा सामना करावा लागू नये तसेच कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये व कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
गाय गोठा अनुदान योजनेची वैशिष्टये
- महाराष्ट्र सरकार द्वारे गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.
- या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते.
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसे दोंघांची बचत होईल.
- गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची राशी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
- गाय गोठा अनुदान योजना ही शरद पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने सुद्धा ओळखण्यात येते.
- गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यास तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
गाय गोठा योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान
गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे
आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय आणि म्हैशी असतात कारण गाई आणि म्हशी पालन हा शेतकऱ्यांना पारंपरिक आणि शेतीसाठी जोडव्यवसाय आहे परंतु गाई-म्हशींसाठी निवाऱ्यासाठी ग्रामीण भागात जागा उपलब्ध नसते तसेच जनावरांना ठेवण्यात येणारी जागा खडबडीत व आबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असते.
ग्रामीण भागातील गोठे कच्चे बांधले जातात.जनावरांचे शेण व मूत्र साठविण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे ते गोठ्यात इतरत्र पडलेले असते.तसेच पावसाळ्यात जमिनीला दलदलीचे स्वरूप प्राप्त झालेले असते.याच जागेत जनावरे बसत असल्यामुळे त्यांना विविध प्रकारचे आजार होतात.
त्यामुळे काही जनावरांना स्तनदाह होऊन हजारो रुपये खर्च करावे लागतात काही वेळेस गाई म्हशींची कास निकामी होते.अस्वच्छतेमुळे जनावरांच्या खालील बाजूस जखमा देखील होतात.बऱ्याच ठिकाणी गोठ्यामध्ये जनावरांना चारा देण्यासाठी गव्हाणी सुद्धा बांधलेली नसतात.जनावरांना मोकळ्या जागेत चारा टाकला जातो या चाऱ्यावर बऱ्याच वेळा शेण व मूत्र पडल्यामुळे जनावरे तो चारा खात नाहीत व चारा वाया जातो.
गोठयातील ओबडधोबड जमिनीमुळे जनावरांपासून मिळणारे मौल्यवान मूत्र व शेण यांचा साठा न करता आल्यामुळे ते मोठया प्रमाणावर वाया जाते.जनावरांचे मूत्र व शेण हे एक उत्कृष्ठ प्रकारचे सेंद्रीय खत असल्याने जनावरांच्या गोठयातील जागा ही सिमेंट काँक्रीटचा वापर करुन पक्क्या स्वरुपात सपाटीकरण केल्यास जनावरांपासून मिळणाऱ्या मूत्र व शेण गोठयाशेजारील खडडयामध्ये एकत्र जमा.करुन त्याचा शेतजमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी उपयोग करुन घेता येईल.तसेच गव्हाणी बांधून गुरांना त्याचा चारा खाण्यासाठी उपयोग होईल.
- या योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांच्यासाठी पक्या गोठ्याचे बांधकाम करण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत २ ते ६ गुरांसाठी एक गोठा बांधण्यात येईल त्यासाठी ७७१८८/- रुपये अनुदान दिले जाईल.
- ६ पेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच १२ गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाईल.
- १२ पेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजेच १८ गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी तिप्पट अनुदान देण्यात येईल.
- गुरांकरिता २६.९५ चौ.मी.जमीन पुरेशी धरण्यात आली आहे तसेच त्याची लांबी ७.७ मी. आणि रुंदी ३.५ मी.असेल
गव्हाण ७.७ मी. X ०.२ मी. X ०.६५ मी. आणि २५० लीटर क्षमतेचे मूत्रसंचय टाके बांधण्यात येतील.
जनावरांना पिण्याच्या पाण्याची २०० लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बांधण्यात येईल. - सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठयांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील.
गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा.
गाय गोठा अनुदान 2023 योजनेअंतर्गत सदर लाभार्थ्याचे काम मंजूर झाल्यास योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे फोटो
सदर लाभार्थ्याचे काम मंजूर झाल्यास योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे फोटो
(i) काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो
(ii) काम सुरू असतानाचा फोटो
(iii) काम पूर्ण झालेल्याचा फोटो व लाभार्थी सह फोटो इत्यादी
हे तीन प्रकारांमधील फोटो अंतिम देयक प्रस्ताव सोबत ७ दिवसात सादर करणे बंधनकारक राहील.
- गाय गोठा योजनेअंतर्गत लाभार्थ्याला गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधून देण्यासाठी अनुदान देण्यात येते.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला शेळीपालनासाठी शेड बांधून देण्यात येते
- लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत कुकूट पालनासाठी शेड बांधून देण्यात येते.
- लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत भू संजीवनी नाडेप कंपोस्टिंग साठी अनुदान देण्यात येते.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होते
- या योजनेमुळे गावाचा व शेतकऱ्यांचा विकास होण्यास मदत होते.
- गाय गोठा अनुदान योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारेल.
- राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- गाय गोठा अनुदान योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल.
- गाय, म्हैस, शेळी, कुकुटपालन यांसाठी शेतकऱ्यांना शेड तसेच गोठा बांधण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेअंतर्गत गाय, म्हैस, शेळी यांना राहण्यासाठी शेड तसेच गोठा उपलब्ध होईल त्यामुळे त्यांचे ऊन, वारा, पावसापासून बचाव होईल.
- गाय गोठा योजनेअंतर्गत पुरुष शेतकऱ्यांसोबत महिला शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल.
या योजनेसाठी आवश्यक पात्रता व कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- अर्जदार शेतकरी असणे आवश्यक
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- अर्जदाराचे मतदान कार्ड
- मोबाईल क्रमांक
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक (15 वर्षाच्या वास्तव्याचा दाखला असणे आवश्यक)
- अर्जदार ग्रामीण भागात राहणारा रहिवासी असावा.
- आदिवासी प्रमाणपत्र
- जन्माचे प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- या योजनाआधी शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठ्याचा लाभ न घेतल्याबद्दल घोषणापत्र जोडणे आवश्यक.
- ज्या जागेत शेड बांधण्यात येणार आहे त्या जागेत अर्जदाराचे सह-हिस्सेदार असल्यास त्यांचे संमतीपत्र / ना हरकत प्रमाणपत्र.
- ग्रामपंचायत शिफारस पत्र
- अर्जदाराकडे अल्पभूधारक प्रमाणपत्र असणे आवश्यक
- अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षक,सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- अर्जदाराकडे कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र व जॉब कार्ड असणे आवश्यक.
- अर्जदारांना जनावरांसाठी गोठा/शेड बांधण्याचे अंदाजपत्रक सोबत जोडणे आवश्यक आहे.
