नेवासा :
महीको या कंपनीच्या बाउन्सर वाण ही कपाशी कशी चांगली असते, तिला फवाऱ्याची गरज नसते, कैऱ्या जास्त येतात,एकरी अठरा क्विंटल पर्येंत उत्पादन कसे निघते याविषयी महिको कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना पॉन्सर वानविषयी प्लॉटवरच प्रत्येक्षात इत्यभूत अशी माहिती देण्यात आली.
कार्येक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यभान आघाव यांनी सांगितले की, माझी शेती ही पूर्णपणे विषमुक्त शेती असते.मी रासायनिक खत अजिबात वापरीत नाही.थोडक्यात शेणखताचा जास्त वापर करतो व चांगले उत्पन्न काढतो.तसेच तिळापूरचे प्रगतशील शेतकरी व सोसायटीचे चेरमन हिरालाल रंगनाथ जाधव यांनी तर असे सांगितले की, यावर्षी माझे कपाशीचे उत्पन्न हे एकरी 20 क्विंटल निघाल्याशिवाय राहणार नाही.तसेच दुसरे प्रगतशील शेतकरी सीताराम जाधव यांनी ह्या वाणाचा कापूस वेचताना मागे नकटी मध्ये कापूस अजिबात शिल्लक रहात नाही, असे सांगून महीको कंपनीचे पॉन्सर हे कपाशीचे वाण इतर कंपनीच्या वाणापेक्षा नक्कीच चांगले असल्याचे सर्वांसमक्ष आवर्जून सांगितले.
कार्येक्रमास शेवगावचे वितरक शुभम लाहोटी साहेब, घोडेगाव येथील ग्रीन गोल्डचे प्रकाश शिदोरे साहेब, पठाडे साहेब,सोनईचे ऋषिकेश कुऱ्हे पाटील , व इतर अनेक वितरक हजर होते.
तसेच महिको कंपनी ही जवळ जवळ 35 प्रकारच्या विविध वाणांचे संशोधन करून दरवर्षी अजून त्यात काय बदल करता येईल व शेतकऱ्यांचे मन कसे जिंकता येईल असे एकना अनेक प्रकारचे संशोधन महिको कंपनी करीतच रहाते. अशी माहिती महिको कंपनीचे सुंदर वायड साहेब यांनी दिली.तसेच सूत्र संचालन भगवान पाटील साहेब यांनी केले. तर योगेश गुंजाळ साहेब यांनी सर्वांचे आभार मानले.यावेळी काही शेतकऱ्यांनी काही शंका उपस्थित केल्या त्यामध्ये पुढील वर्षी महिकोचे पॉन्सर हे वाण सर्वांनाच भेटेल का ? आलेल्या मालास चांगली बाजारपेठ मिळेल का ? तसेच महिको कंपनीने नेवासा तालुक्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवावी अश्या सूचनाही मांडल्या.
यावेळी सर्वांसाठी रुचकर व सुंदर असे स्नेहभोजन देण्यात आले.गंगाभाऊ बेल्हेकर व सर्व बेल्हेकर परिवाराने कार्येक्रमाचे उत्कृष्ठ असे नियोजन केले होते.तसेच स्नेह फाउंडेशनचे गोरक्षनाथ पटारे, संदीप बेल्हेकर, सुभाष सोनवणे,अशोक बेल्हेकर,प्रमोद जाधव,व पंचक्रोशीतून इतर अनेक शेतकरी कार्येक्रमासाठी उपस्थित होते.
मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
