आळे :

आळे गावाचा जिव्हाळ्याचा विषय पिपंळगाव जोगा डावा कालवा व पोटचारी यात गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना भेटली नाही आणि दुसरा विषय आगरमळा, बाभळबन,तितरमळा, आंनदवाडी व चिंचकाई ओढा येथील लोकांना चारी होऊन देखील चिंचकाई ओढ्यावर पूल नसल्या कारणाने अनेक वर्ष पाणी मिळत नाही .तसेच गावची पाणी वापर संस्था स्थापन करणे या संदर्भात व राजुरी येथील 24 नंबर चारी या संदर्भात  सौ आशाताई बुचके(सदस्या -जि. प. सदस्य पुणे )यांनी काल सिंचन भवन पुणे येथे सर्व अधिकारी यांच्यासमवेत मिटिंग आयोजित केली होती,या मिटिंगमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली,चिंचकाई ओढ्यावर पुलाचे लवकर काम करणे आणि कॅनॉल व चाऱ्याच्या नुकसान भरपाई संदर्भात 6 प्रकारणाचे मूल्यांकन करून दर निश्चित करून शेतकऱ्याना मोबदला देणें तसेच आळे, संतवाडी, कोळवाडी गावची पाणीवापर संस्था स्थापन करणे अशी चर्चा झाली.

या वेळी जलसंपदा विभाग पुणे मुख्य अभियंता श्री धुमाळ साहेब,उप जिल्हाअधिकारी भू संपादन पुणे श्री पाटोळे साहेब, कुकडी कार्यकरी अभियंता श्री कडूस्कर साहेब, श्री सोनजे साहेब, श्री हांडे साहेब, तसेच वारूळवाडी ग्रामपंचायत सरपंच श्री राजुशेठ मेहेर, येनेरे गावचे सरपंच श्री अमोलजी भुजबळ , आळेगातील श्री नवनाथ निमसे सरपंच संतवाडी, श्री गणेशजी गुंजाळ मा. ग्रामपंचायत सदस्य आळे, श्री निलेश दत्तात्रय भुजबळ ,राजुरी येथील रवीशेठ हाडवळे व इतर शेतकरी उपस्थित होते, लवकरच आळेगावतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि चिंचकाई ओढ्यावर पूल दोन्ही कामे लवकर होणार आहेत तसेच पाणी वापर संस्थाही स्थापन होणार आहे,हि सर्व कामे मार्गी लावल्याबद्द्दल आळे संतवाडी कोळवाडी ग्रामस्थांच्या वतीने सौ आशाताई बुचके यांचे व सर्व अधिकाऱ्यांचे शेतकरी वर्गाने मनःपूर्वक आभार मानले .

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!