उंब्रज ( जुन्नर) :
उंब्रज नंबर २ हद्दीतील पळशेत नामे शिवारातील सहा एकर क्षेत्रातील उसाला अचानक आग लागल्याने संबधीत शेतकऱयांचे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.ऊसउत्पादक शेतकरी सुरेश भिमाजी हांडे,,निवृत्ती गणपत हांडे,गजानन गेनभाऊ दांगट,सीताराम लक्ष्मण हांडे या शेतकऱ्यांच्या मालकीच्या उसाला ही आग लागली असून उभे उसाचे पीक जळून खाक झाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर घटना ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली असून ही भीषण आग महावितरणच्या विद्युत तारांचे घर्षण होऊन शॉटसर्किट मुळे लागली असावी असा अंदाज येथील स्थानिक प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
जळून खाक झालेल्या ऊसपिकाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संबधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
शौकत शेख
प्रतिनिधी