आळेफाटा :

उन्हाळाच्या सुट्ट्या, लगीनसराई यामुळे लागोपाठ आलेल्या सुट्टयानिम्मित आपल्या गावी धाव घ्यायच्या उद्देशाने प्रवास करताना असंख्य वाहन चालकांना आळेफाटा येथे चक्काजाम अनुभयास मिळतो.पोलीस मात्र इमाने इतबारे 40 डिग्री सेल्सियस तापमानात अंगाची लाही लाही होत असताना आपले वाहतूक सुरळीत करण्याचे कर्तव्य पार पाडताना दिसत आहे.

दुचाकी चारचाकी वाहने वाहतूक नियमांकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करून मिळेल त्या दिशेने वाट शोधताना वाहतूक कोंडीमध्ये अडकतात.मात्र आळेफाटा पोलीस प्रशासन अपुऱ्या स्टाफ सह आपले कर्तव्य चोख बजावत आहे.ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत आहे.यामध्ये विशेषतः आळेफाटा पोलीस निरीक्षक यशवन्त नलावडे अतिरिक्त पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, कॉन्स्टेबल फलके, ताजणे व इतर सर्वच स्टाफ सकाळी 7 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे कर्तव्य बजावताना दिसतात.त्यामुळे काहीसा दिलासा वाहतूक प्रवाशांना मिळाला आहे.


नाशिक पुणे महामार्गसाठी चाळकवाडी ते भंडलकर वस्ती असा बायपास मंजूर असताना त्याचे संथ गतीने सुरु असलेले काम त्यामुळे वाहतूक कोंडीची नित्याचीच अडचण ठरत आहे.बायपास चे काम अंतिम टप्यात असून बायपास शेजारील सब रस्ता खुला केल्यास कमीत कमी नाशिक पुणे रोड वरील ट्राफिक काही प्रमाणात नियंत्रणात येण्यास मदत होऊ शकेल.


लग्नसराईसाठी मिरवणुकीमुळे वाहनांचा ताफाच्या ताफा चौकातून डी जे च्या तालावर नाचत गाजत जात असताना वाहतूक कोंडीमध्येच अडकून पडत आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने नक्की कुठं कुठं लक्ष द्यायचं असा यक्षप्रश्न उभा राहत आहे.आळेफाटा बस स्टॅन्ड मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या बस याना ही ट्राफिक चा मोठा फटका बसत असून प्रवाशांना वाळवंटात सफर केल्याचा अनुभव लालपूरीतून घ्यावा लागत आहे.

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिदवाक्याला साजेशी जनसेवा आळेफाटा पोलीस प्रशासनामार्फत बजावतानाचे सुखदायी चित्र खाजगी प्रवासी वाहतूक करणार्यांना आळेफाटा मुख्य चौकात याची देही याची डोळा अनुभवत आहे.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!