राजुरी :-

चैत्र पौर्णिमा  श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जन्मोत्सवाचे कार्यक्रम चालू होते या कार्यक्रमात असंख्य भाविक उपस्थित होते पहाटेचे जन्मोत्सवाचे सुश्राव्य कीर्तन ह भ प विशाल महाराज हाडवळे यांच्या वाणीतून संपन्न झाले प्रथमता त्यांचे मनापासून आभार व धन्यवाद त्यानंतर जन्मोत्सवाचा पाळणा व अभिषेक सोहळा संपन्न झाला त्यानंतर महाआरती झाली या महाआरतीसाठी असंख्य श्री हनुमान भक्त होते या महाआरतीच्या प्रसादासाठी वरद विनायक कन्स्ट्रक्शन व शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री. अशोक शेठ औटी यांच्यावतीने 21 किलो शिरा प्रसाद देण्यात आला यासाठी त्यांचे श्री. हनुमान देव व इतर देवस्थान कमिटी च्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद व आभार आणि सर्वात महत्त्वाच श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट राजुरी यांच्या वतीने नऊ ते पाच या वेळेमध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजन केले होते या रक्तदान शिबिरासाठी सर्व रक्तदात्यांसाठी नाश्त्यासाठी व रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांसाठी द्राक्ष स्वरूपात श्री.राहुल शेठ रखमाजी रायकर यांच्या माध्यमातून अन्नदान स्वरूपात मदत करण्यात आली.

विशेष बाब या रक्तदानामध्ये 132 रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यामध्ये महीला सुध्दा सहभागी झाल्या होत्या त्यांचे देखील श्री. हनुमान देवस्थान च्या वतीने आभार व धन्यवाद. रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी दीपक शेठ औटी माजी सभापती, प्रिया ताई हाडवळे, सरपंच, माऊली शेठ शेळके उपसरपंच, एकनाथ शिंदे ग्रा. सदस्य, गौरव घंगाळे ग्रा.सदस्य, जयसिंग शेठ औटी युवा नेते पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, धीरज शेठ औटी, विशाल भाउ डुंबरे मनसे नेते, स्वप्निल शेठ औटी, राजूशेठ हाडवळे, माजी उपाध्यक्ष ज्ञानदीप पतसंस्था, संदीप शेठ औटी तंटामुक्ती अध्यक्ष, गणेश जी हाडवळे सामजिक कार्यकर्ते, देवस्थानं चे अध्यक्ष मुरली शेठ किसन पाटिल औटी, संतोष गफले विश्वस्त, विजय ताजवे विश्वस्त, धनुभाऊ औटी आणि मित्र परिवार, नीलेश (बंटी शेठ) हाडवळे सामजिक कार्यकर्ते, अनिल शेठ रायकर सामजिक कार्यकर्ते, रविशेठ हाडवळे सामजिक कार्यकर्ते, स्वप्निल शेठ हाडवळे सामाजिक कार्यकर्ते, सतीश शेठ हाडवळे सामाजिक कार्यकर्ते, जगदीश रायकर, हेमंत औटी, सौरव रहाणे, मयूर अल्हाट, अनिकेत ताजवे, प्रतीक ताजवे, तुषार रहाणे इत्यादी तरूण श्री हनुमान भकत्त यावेळी उपस्थित होते.

त्याच प्रमाणे मधल्या वेळेत तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे आणि भाजप नेत्या आशाताई बुचके यानी भेट दिली. विशेष म्हणजे पंचायत समिती सदस्या सारिका ताई औटी यांनी अपल्या पतीसोबत रक्तदान करून सर्वांनी रक्तदान करावे आसा संदेश दिला.गणेश औटी यांनी चाकण रक्तपेढी यावेळी रक्तदात्यांसाठी उपलब्ध करुन दिली. यावेळी अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक या सर्व क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्तींनी उपस्थित राहून रक्तदान केले ज्या ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले व जे जे रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहिले परंतु त्यांचे हिमोग्लोबिन कमी भरले अशा सर्व श्री हनुमान भक्तांचे श्री हनुमान देव व इतर देवस्थान कमिटीच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद व सर्वांचे मनापासून आभार.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!