बीड :
मागील पाच दिवसापासुन जिल्हात आवकाळी पाऊस सैताना सारखा पडत आडे. गारपीट आणि वादळी वाऱ्याने रंबी हंगामातील पिके फळबागा उध्वस्त झाल्या आहे. विजपडुन शेतकरी व मुकी जनावरे दगावली आहेत. अशी परिस्थिती शेतकऱ्यावर ओ़ढावलेली असताना देखील नेते मंडळी मार्केट कमिटीचा गुलाल घेण्यात तर पडलेले नेते खर्चाचा हिशोब करण्यात व्यस्त आहे. बीडचे पालकमंञी ना. अतुल सावे हे देखील पद आल्यापासून बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांना शोधणाऱ्याला रोख ५१ रुपयाचे बक्षीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर केले आहे.
स्वाभिमानीने जाहीर केले बक्षीस, गावागावात पोस्टर
बीड जिल्हाला आवकाळी पावसाने झोडपुन काढले आहे. तालुक्यात प्रत्येक मंडळात नद्याना पुर आला आहे. विज पडुन गाय म्हैस शेळी मेढी बैल दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. घरातल्या कापसाला कुणी विचारायला तयार नाही. शेतकय्रांचा मृत्यु होत आहे. पाच दिवसा पासुन वादळी वारा, गारपिट, आवकाळी पावसाने रब्बीतील गहु ,ज्वारी, बाजरी, कांदा, उन्हाळी सोयाबीन, फळेभाज्या पालेभाज्या, मोसंबी,टरबूज,पपई व इतर फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र बीड जिल्ह्यात कुठेही प्रशासनाने पंचनामे केलेले नाहीत की येवढे मोठे संकट ओढावलेले असताना देखील पालकमंञी कमीत कमी धिर द्यायला देखील आले नाहीत.त्यामुळे गेवराई तालुक्यातील शेतकरी आक्रमक असून पालक मंत्री दिसेल तिथे त्यांचा ‘शेतकरी स्टाइल, ने सत्कार करणार आहेत. त्यामुळे पालकामंत्र्याना शोधून देणाऱ्यास रोख ५१ रुपये बक्षीस दिले जानार आसल्याचे बॅनर गेवराई तालुक्यात गावोगावी लावन्यात आले आहेत. हे बक्षीस नगदी स्वरूपात दिले जाणार आहे.
