अकोले :-
युवासेना अकोले तालुक्याच्या वतीने खीरवीरे येथील मोबाईल टॉवर रेंज संदर्भात बी एस एन एल च्या कार्यकारी अभियंता मा. बोऱ्हाडे मॅडम यांना निवेदन देऊन सदर विषयात तात्काळ लक्ष देऊन सदर प्रश्न त्वरित सोडवावा अन्यथा युवासेना अकोले तालुक्याच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
प्रसंगी युवासेना जिल्हा चिटणीस श्री संदेशजी एखंडे,विधानसभा प्रमुख श्री केतन भांगरे, युवासेना तालुका प्रमुख श्री गणेश अस्वले, युवासेना तालुका प्रमुख (ग्रामीण) श्री राहुल लांडे,युवासेना शहर प्रमुख श्री महेश हासे,तालुका कार्याध्यक्ष श्री अमोल पवार,उपतालुका प्रमुख श्री राम एखंडे, शहर सरचिटणीस श्री अरुण गोंदके, उपतालुका प्रमुख श्री काशिनाथ बेनके, शाखा युवा अधिकारी श्री सागर बेनके, उपशाखा युवा अधिकारी श्री शशिकांत बेनके तसेच सर्व युवासेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.
