आळेफाटा :
पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असणारे चार महत्वाच्या शहराना जोडणारे आळेफाटा हे प्रसिद्ध शहर असून , जुन्नर तालुक्यातील महत्वची बाजरपेठ म्हणून ओळख जरी असली तरी याठिकाणी प्रशासनाने दिलेल्या बांधकामाचे नियम उधळून कुठलीही शासकीय कागदांची कायदेशीर पूर्तता पूर्ण न करता अनेक अवैध इमारती या ठिकाणी उभ्या आहेत. काहीचे तर काम सुरु आहे या असणाऱ्या इमारती आज जरी नाही तरी भविष्यात धोकादायक ठरणार असून या सर्व प्रकराकडे प्रशासन लक्ष देत नाही. नुकतेच वडगाव आनंद चे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाळुंज यांनी अन्न त्याग उपोषण केले मात्र दोन दिवसात जुन्नर चे गट विकास अधिकारी सूर्यवंशी यांनी या सर्व प्रकारांची जातीने पाहणी करून यावर कारवाई करणार असे आश्वासन दिले आणि वाळुंज याना उपोषण मागे घेण्यास सांगितले.
परंतु खरोखर जुन्नर चे गट विकास अधिकारी सूर्यवंशी हे लक्ष घालणार का ? आणि तसे असले तर या अगोदर चे सरकारी अधिकारी काय करत होते ? असे अनेक प्रश्न उभे राहतात आणि सर्व प्रकार शासनाच्या अधिकाऱ्यांन समोर चालू असताना या अगोदर कारवाई का झाली नाही ? म्हणजेच शेतच कुंपण खात आहे कि कुंपण शेत खात आहे अशी चर्चा जाणसामान्य माणसात होत आहे . आणि शेवटी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाळुंज यांचा उपोषणाला यश मिळेल कि फक्त कागदी घोडे नाचतील हे येणाऱ्या ३० जून ला दिसेल