आळेफाटा :
श्रीमती रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालय वडगाव आनंद येथे विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या सर्व सुविधायुक्त टॉयलेट ब्लॉकचा लोकार्पण सोहळा जागतिक आरोग्य दिन दिनांक सात एप्रिल चे औचित्य साधून करण्यात आला.
वीरबॅक ॲनिमल हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर फंडातून व क्रांती फाउंडेशन व श्रीमती रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालयातील माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त आर्थिक योगदानातून सर्व सुविधायुक्त अशा टॉयलेट ब्लॉकचे काम करण्यात आले.गेल्या पंचवीस वर्षापासून सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग व पालक वर्ग यांची सर्व सुविधायुक्त अशा टॉयलेट ब्लॉकची मागणीला आज पूर्णविराम मिळाला.
मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व सुविधायुक्त राज्यभरात मॉडेल ठरू शकत असलेल्या टॉयलेट ब्लॉकची संकल्पना वडगाव आनंद येथे देवकर विद्यालयात साकारण्यात आली.
लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी वीरबॅक ॲनिमल हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पदाधिकारी एरिया बिझनेस मॅनेजर मुंगसे सर, रिजनल बिझनेस मॅनेजर कुंभार सर, एरिया बिझनेस मॅनेजर बाबा वर्पे सर, व्ही एस आर स्वहित डांगे, रवींद्र भूसाळ, विद्यालयाचे अध्यक्ष उल्हास देवकर, पशुवैद्यकीय सेवा देणारे उपसरपंच उंब्रज पोपट चौधरी, राहुल हांडे, सिद्धार्थ गडगे, सुनील गाडेकर, हर्षद हाडवळे, प्रकाश वामन माजी विद्यार्थी हरी ओम ग्रुपचे गणेश भुजबळ, नवनाथ चासकर, निलेश रायकर, संदेश काशीकेदार, श्रीकांत मदने कैलास वाळुंज, नवनाथ वाळुंज, निमेश वाळुंज, समीर देवकर, विकास गडगे, माजी सरपंच प्रदीप देवकर, सुनील गुंजाळ आदी मान्यवर ग्रामस्थ, शिक्षक वृंद, विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावरउपस्थित होते.

विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद यांनी उपक्रमाचे स्वागत केले.तसेच महिला टॉयलेट ब्लॉकचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ रजनी डुंबरे मॅडम व ग्रामपंचायत सदस्य वैशालीताई संजय देवकर यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.या उपक्रमासाठी क्रांती प्रतिष्ठानचे सदस्य सी एस आर फंडासाठी विशेष पाठपुरावा करण्यात अग्रेसर असलेले डॉ संजय देवकर, नंदू भोर, दत्ताराम वाळुंज व विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन सचिन वाळुंज यांचे विशेष योगदान लाभले.तसेच माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके, भाग्यश्री कृषी भांडार चे सर्वेसर्वा शंकर गडगे, शिवतेज ट्रेडिंग कंपनीचे सर्वेसर्वा अनिल गडगे, भिमाजी जाधव, संदीप पादीर यांचे आर्थिक सहकार्य लाभले.सदर उपक्रमाचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे.
