सोलापूर –

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त गुरुविद्या प्रतिष्ठान बसव उत्सव समिती अध्यक्षपदी सौ नमिता थिटे यांची निवड करण्यात आली. गुरुवारी हॉटेल समृद्धी येथील सिद्धेश्वर पेठ येथे गुरुविद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सोमशेखर भोगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली.

यावेळी गुरुविद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सातलिंग शटगार, प्रतिष्ठानचे उपाध्यक्षा सौ राजश्री तडकासे यांच्या शुभहस्ते सौ नमिता थिटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यंदाच्या वर्षी विविध मान्यवराना बसव पुरस्कार, मोफत क्रिडा प्रशिक्षण, मोफत आरोग्य तपासणी शिबिर असे उपक्रम राबविण्यात येणार आहे.

असे‌ गुरूविद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सातलिंग शटगार यांनी जाहीर केले. यावेळी प्रतिष्ठानचे सचिवा श्रीदेवी यळमेली, सहसचिवा सौ रेणूका हब्बू, सदस्या सौ नर्मदा कनकी, खजिनदार सौ शिवलीला भोगडे, सदस्य श्री विजू भोगडे, सदस्य श्री दत्तात्रय जामदार, सल्लागार श्री मोहन भूमकर, सदस्य श्री आनंद लिगाडे आदी उपस्थित होती.शेवटी आभार प्रदर्शन सचिवा सौ श्रीदेवी यळमेली यांनी केले.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!