आळेफाटा :
व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी संचलित स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल आळेफाटा येथे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात व मोठ्या उत्साहात साजरी झाले.या कार्यक्रमांमध्ये बच्चो की दुनिया या संकल्पनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे दर्शन घडवत उपस्थित मान्यवरांची मन जिंकली.यामध्ये नर्सरीत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला.विविध नृत्याविष्कार, गायन, एकांकिका, लाठीकाठी मैदानी स्पर्धा, दांडपट्टा, वैयक्तिक गायन, नृत्य व रायफल शूटिंग या विविध कलागुणांचे उत्साहाने सादरीकरण केले.यावेळी उत्तम मंच सजावट व मंच विद्युत रोषणाई उपस्थितांचे मन जिंकली.
या कार्यक्रमातून आपल्या मुलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सोशल मीडियाच्या जीवघेण्या स्पर्धेतून दूर कसे ठेवावे याबाबतची निकडीची काळाची गरज याबाबतीत पालकांना अनमोल मार्गदर्शन करण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमासाठी स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रमीजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अविरत परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सौ संज्योत वैद्य, उपाध्यक्ष अजित काकडे, सचिव अरविंद वैद्य, व्ही जे इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष वसंतराव सोनवणे, सर्वर पठाण, राजू चौगुले, ललित काळे, संजय चौगुले, मुख्याध्यापिका रमिजा शेख, व्यवस्थापक असरार शेख, स्ट्रॉबेरी स्कूल संगमनेर चे मुख्याध्यापक रमेश दिघे सर आदी मान्यवर, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामली नवले यांनी केले.तसेच आभार पूनम लेंडे यांनी मानले. वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
