आळे :
शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील अग्रणीय समजली जाणारी आळे येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती शिक्षण मंडळाच्या संचालक पदाच्या निवडणुकीचे मतदान पार पडले.या निवडणुकीत सर्वच मतदारांनी उत्स्फूर्तरीत्या मतदानाचा हक्क बजावला.त्यामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज स्वाभिमान पॅनलने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.यावेळी विजयी उमेदवारांना मिळालेली मतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे
जीवन रामदास शिंदे – 1558
भाऊ लक्ष्मण कुऱ्हाडे -1486
सौरभ नेताजी डोके – 1362
देविदास नरेंद्र पाडेकर -1328
किशोर बापूराव कुऱ्हाडे -1320
बबन रावजी सहाणे – 1309
अर्जुन सखाराम पाडेकर – 1299
दिनेश महीपत सोनवणे – 1287
बाबुराव कान्हू कुऱ्हाडे -1265
रमेश गोविंद कुऱ्हाडे – 1260
अजय केरभाऊ कुऱ्हाडे – 1252
सम्राट संजय कुऱ्हाडे – 1250
प्रदीप कुमार गुंजाळ – 1240
शिवाजी गेनभाऊ गुंजाळ- 1227
उल्हास सावळेराम सहाणे – 1217
अरुण पोपट हुलवळे – 1191
कैलास गेनभाऊ शेळके – 1184
अशी विजयी उमेदरवारांची नाव आहेत.
यावेळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व ज्ञानेश्वर ग्रामोनत्ती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे यांचे संत ज्ञानेश्वर माऊली पॅनल च्या फक्त 2 उमेदवारांची वर्णी लागली.यात भाऊ लक्ष्मण कुऱ्हाडे व उल्हास सावळेराम सहाणे असे दोन उमेदवार निवडून आले.
तर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके, माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके, माऊली कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष धनंजय काळे, विद्यमान आळे गावचे सरपंच प्रीतम काळे, उपसरपंच विजय कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली श्री संत ज्ञानेश्वर महाराज स्वाभिमान पॅनल च्या 17 पैकी 15 जणांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.प्रतिष्ठेच्या समजल्या या निवडणुकीत दोन्ही पॅनलच्या दिगज्जांची प्रतिष्ठा पणाला लावली परंतु श्री संत ज्ञानेश्वर महाराज स्वाभिमान पॅनल च्या उमेदवारांनी यात बाजी मारली.
निवडणूक मतमोजणी दरम्यान रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू होता.यावेळी सर्वानुमते ऑनलाईन घेतलेले मतदान बाद ठरविण्यात आले.रात्री उशिरा दोन वाजता मतमोजणी सुरू झाली.
आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, अतिरिक्त पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रागिनी कराळे आणि त्यांचा सर्व पोलीस स्टाफ यांच्या वतीने सकाळी सात वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी मतमोजणी होईपर्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण खातरदारी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीने घेण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी रागिनी खडके यांच्या माध्यमातून सर्व मतदारांची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात आली.