उदापूर :-
जुन्नर तालुक्यातील उदापूर गावातील रस्ते गेली वर्षभरापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर ओड्यांवरील पुलावरचे भराव खचले आहेत ठेकेदार या रस्त्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उदापूर कुलवडे मळा डिंगोरे जोड रस्ता व उदापूर काळभैरवनाथ नगर ते गणपती मंदिर माळवाडी रस्ता या दोन रस्त्यांचे काम मागील वर्षी आमदार फंड व जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आले होते परंतु एका वर्षातच या रस्त्याची चाळण झाली आहे त्यामुळे येथील ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे परंतु ठेकेदार या रस्त्यांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही त्यांच्या तक्रारीकडे कुणीही गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र दिसत आहे यावेळी काही ग्रामस्थांनी ठेकेदार यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता ठेकेदार त्यांना आज करू उद्या करू अशी उडवा उडवीची उत्तरे देत आहे. भैरवनाथ नगर ते गणपती फाटा येथील रस्त्यावर खडीकरण झाले असून त्यावर कारपेट अजूनही टाकले नाही त्यामुळे झालेले खडीकरन देखील उकडून चालले आहे. जवळपास वर्ष उलटून गेले तरी हे काम अजून पूर्ण झाले नाही त्याचबरोबर तेथील मोरीवरचा भराव मोठ्या प्रमाणात खचला आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य निलेश नारुडकर, चैत्राली शिंदे, जालिंदर शिंदे, दत्तात्रय बटवाल, संतोष माळवे, नितीन शिंदे, यांसह तेथील ग्रामस्थ करत आहेत.
पावसाळ्यात वाहून गेलेला पुलाचा भराव अजूनही नादुरुस्त

अमुप मळा येथील ओढ्यालगत असलेल्या पुलाचा भराव मातीचा असल्यामुळे परतीच्या पावसात वाहून गेला आहे वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही या पुलाचा भराव अजूनही टाकण्यात आला नसून अजूनही नादुरुस्त आहे तसेच या पुलाला संरक्षक कठाडे नसल्याने शाळेतील विद्यार्थी व शेतीमाल वाहतूक करणार्या शेतकऱ्यांसाठी हा धोकादायक बनला आहे. या पुलावरून जाणारा उदापूर ते डिंगोरे जोड रस्ता असल्यामुळे कुलवडे मळा, शिंदे मळा, अमुप मळा, या वस्तीवरील शेतकरी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात ओढ्याला जास्त पाणी आल्यावर पुल पाण्याखाली जातो त्यामुळे याचे आरसीसी बांध काम करून उंची वाढवण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत उपसरपंच जयश्री अमुप सदस्य राजेंद्र कुलवडे, सदस्य छाया चौधरी, सदस्य पुनम हे शिंदे, ग्रामस्थ माधव अमुप, दिनेश कुलवडे, राहुल कुलवडे, तुषार अमुप, सुनिल कुलवडे, बबन कुलवडे, यांसह अनेक शेतकरी करत आहेत.
एककोटी लक्ष खर्च करूनही काम निकृष्ट दर्जाचे
कुलवडे मळा रस्ता ७० लक्ष व भैरवनाथ नगर रस्ता ३० लक्ष एवढा निधी खर्च करून देखील या दोन्ही रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहे ज्यावेळी ही सदर कामे चालू होती त्यावेळी ती कामे इस्टिमेट नुसार होत नाही तसेच कामाचा दर्जा योग्य पद्धतीचा नसल्याची तक्रार ठेकेदार व सुपरवायझर यांच्याकडे वेळोवेळी मांडली असताना देखील त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून रस्त्याची कामे करवून घेण्यात आली तसेच योग्य पद्धतीने साईटपट्टी, साईट गटार, डब्ल्यू बी बी एम, व कारपेट निकृष्ट दर्जाची वापरल्यामुळे हे रस्ते खचले आहेत त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची ठेकेदारांनी इन्स्टीमेंट नुसार दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विनोद भोर यांनी केली.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमाल नुकसानीची पाहणी करण्यासाठी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके या भागात आले असता या एवढ्या कमी कालावधीत कुलवडे मळा रस्ता उखडल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती त्यावेळी त्यांनी ठेकेदाराला फोन करून सूचना केल्या होत्या ठेकेदारानेही पाऊस उघडल्यानंतर त्या रस्त्याची काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते त्यानंतर मी सुद्धा अनेक वेळा त्या ठेकेदाराला भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता काम आज करू उद्या करू असेच सांगत आहे जिल्हा परिषद माजी सदस्य अंकुश आमले यांच्या कानावर ही बाब घातली त्यांनी देखील संपर्क केला परंतु पाऊस उलटूनही चार महिने झाले तरीही ठेकेदार इकडे फिरकला नाही,
उदापूर सरपंच सचिन आंबडेकर
