आळेफाटा :

आळे येथील उपसरपंच अ‍ॅड विजय कुऱ्हाडे यांच्या कार्यालयाच्या उदघाटनासाठी पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ विधीज्ञ व प्रसिद्ध सरकारी वकील अ‍ॅड उज्ज्वल निकम यांच्या शुभहस्ते फित कापून संपन्न झाले.यावेळी जुन्नर तालुका आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखाना चेअरमन सत्यशील शेरकर, उज्वल निकम यांचे चिरंजीव अ‍ॅड अनिकेत निकम, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप निफाडकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता अमोल मातेले, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे, मोहित ढमाले, भाऊसाहेब देवाडे, प्रसन्न अण्णा डोके, माऊली कुऱ्हाडे, जी एल गुंजाळ, माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, विघ्नहर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष गणेश कवडे, समर्थ गुरुकुल विश्वस्त वल्लभ शेळके, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ अध्यक्ष अजय नाना कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सौरभ डोके, सुधीर लाड, सुरेखाताई वेठेकर, आळे गावचे सरपंच प्रीतम काळे, सागर गुंजाळ, दिनेश सहाणे, योगेश जाधव, विजय कुऱ्हाडे यांचे आई-वडील, युवानेते अमित बेनके, विशाल पाटील भुजबळ, समता परिषद अध्यक्ष निलेश भुजबळ आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड उज्वल निकम व त्यांचे सुपुत्र अ‍ॅड अनिकेत निकम जुन्नर तालुक्यात प्रथमतःच येत असताना त्यांनी ओझर गणपती येथे महाअभिषेक, खोडद येथील जी एम आर टी संस्थेला भेट, आळे येथील संत ज्ञानेश्वरांनी वेद वदविलेल्या रेडा समाधी मंदिरास भेट, ज्येष्ठ साहित्यिक व गझलकार प्रदीप निफाडकर यांच्याद्वारे उद्घाटनस्थळी प्रकट मुलाखत असा त्यांचा भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप निफाडकर यांनी अ‍ॅड उज्वल निकम व त्यांचे सुपुत्र अ‍ॅड अनिकेत निकम यांना भारतीय लोकशाही, संविधान व कायदा अभ्यासताना या विषयावर त्यांना विविध प्रश्न विचारले.यावेळी दोघांनीही विचारलेल्या सर्वच प्रश्नांना अभ्यासपूर्वक उत्तरे दिली.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अ‍ॅड विजय कुऱ्हाडे यांच्या घरात चारजण वकील आहेत. त्यांचे धाकटे बंधू संदीप आणि वहिनी सौ अलका हे आधीच वकील झाले असून आता विजय कुऱ्हाडे व त्यांची शिक्षिका पत्नी स्मिता कुऱ्हाडे यांनीही वकिलीचे शिक्षण घेतले आहे.मुलाखतीला बार असोसिएशनचे वकील तसेच विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यामुळे जुन्नर तालुका आमदार अतुल बेनके यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील असे सांगितले व उद्घाटन कार्यक्रमास ऑनलाईन व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या.

यावेळी संविधानाच्या प्रतिमेचे पूजन, ईशस्तवन, शिवगर्जना, महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा गीत ह्या गोष्टींसह सर्व पाहुण्यांचे स्वागत माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली कुऱ्हाडे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत भुजबळ यांनी केले.सूत्रसंचालन गणेश गुंजाळ, शोभा ढमढेरे यांनी केले.तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी आभार प्रदर्शन केले.अत्यंत सुसज्ज व आकर्षक ऑफिसचा उद्घाटन कार्यक्रम आळेफाटा येथील नगर रस्त्यावरील साई पार्क बिल्डिंग येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

प्रतिनिधी  :-  मनीष गडगे

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!