पालघर :
पालघर जिल्ह्याच्या मधून जाणारा मुंबई ते अहमदाबाद हायवे असून या हायवेला रात्रंदिवस गाड्या चालू असतात, पालघर जिल्ह्यातील मनोर वाडाखडकोना या ठिकाणी डोंगरदरीतून हा हायवे जात असल्याकारणामुळे या ठिकाणीहल्ली मोठ्या प्रमाणात एक्सीडेंट होत असतात, तसेच आज सकाळी 8.40 मिनिटांनी अहमदाबाद ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेंथला चालत्या ट्रकला भीषण आग लागली, वेलीच ड्राइव्हर ला आग लागल्याचे समजल्यामुळे याठिकाणी कोणतीही जीवित हानी झाली नाही,या आधीच स्वरूप मोठ्या भीषण आगीमध्ये रूपांतर झाले त्यामुळे एका बाजूच्या पूर्ण गाड्या थांबवण्यात आल्या आणि मोठ्या प्रमाणात ट्राफिक सुद्धा निर्माण झाली कारण या आगीचं स्वरूप एवढं मोठं होतं की त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी जवळ कुणीच जाऊ शकत नव्हता, आणि फायर ब्रिगेड ची गाडी तिथे पर्यंत पोहोचायला उशीर झाल्यामुळे या आगीने पूर्ण ट्रकला लपेटून घेतलेले होते, त्या ठिकाणी पोलीस प्रशासन वेळीच पोचले मात्र आगीचे स्वरूप खूप मोठ्या प्रमाणात असल्याकारणामुळे लांबूनच हे सर्व दृश्य बघावे लागत होते. कालांतराने या ट्रक वरती लागलेली आग विझवण्यात यश आले मात्र तोपर्यंत पूर्ण ट्रक जळून खाक झालेला होता, वाडा खडकोना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन्ही लेंथला एक्सीडेंट होत असताना दिसून येतात कारण या ठिकाणी चा जो रोड आहे तो वळणाचा आहे आणि त्या ठिकाणावरून येणारे ट्रक स्पीड मध्ये येत असल्या कारणामुळे त्यांना टर्न कापता येत नाही अशातच गाडीतही काही बिघाड होतो तसेच शॉर्टसर्किट झाल्याने सुद्धा गाड्यांना आग लागण्याच्या मोठ्या प्रमाणात घटना या ठिकाणी घडत असतात, त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिकांकडून प्रशासनाला सांगण्यात येत आहे की, या ठिकाणी एक्सीडेंट खूप होतात त्यामुळे या ठिकाणी एक्सीडेंट व्हायला नको यासाठी काहीतरी प्रशासनामार्फत उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून या ठिकाणी एक्सीडेंट कमी होतील, मागच्या वेळेशी दोन-तीन गाड्यांचा या ठिकाणी एक्सीडेंट झालेला होता आणि त्यामध्ये सिलेंडर वगैरे होते त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना आपला जीव धोक्यात टाकून राहावं लागतं कारण जर गॅस सिलेंडर स्फोट झाले असते तर आजूबाजूच्या घरांवरती सुद्धा हे सिलेंडर जाऊन आपटले असते त्यामुळे या ठिकाणच्या राहणाऱ्या स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडून काहीतरी उपाययोजना करून या ठिकाणी एक्सीडेंट कमी कसे होतील याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी करण्यात आलेली आहे.
फैय्याज इनामदार
प्रतिनिधी
