उदापूर :
केंद्र सरकार व राज्य सरकारकडून रेशन लाभधारकांना स्वस्त धान्य बरोबर मोफत धान्य वाटप केले जाते याचा फायदा अनेक गोरगरीब जनतेला होत असतो परंतु सध्या या रेशन धान्याला सर्व्हर डाऊन चे ग्रहण लागले आहे दिवाळी सणसुदीपासून रेशन लाभधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे एकीकडे कामाचे दिवस बुडवून रेशन दुकानापुढे रांगा लावून बसावे लागत आहे तरी देखील सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशन पावती निघत नाही त्यामुळे रेशन दुकानापुढे वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे यात जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांचीच गर्दी रेशन दुकानासमोर असते त्यामुळे याचा सर्वात जास्त त्रास हा जेष्ठ नागरिकांना होतो असे गावो गावात दिसत आहेत त्यामुळे ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन रेशन धान्य वाटप करावे अशी विनंती आदिवासी भागातील उदापूर, डिंगोरे,नेतवड, पिंपळगाव जोगा, मढ, पारगाव, तळेरान, कोपरे, मांडवे,जांबुळशी, मांदारने, सांगनोरे, येथील नागरिक करत आहेत.
यात रेशन दुकानदारांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे दोन-तीन मजुरांना कामाला ठेवून देखील रेशन धान्य वाटप होत नाही त्यामुळे मजुरांना बसवून ठेवून देखील दिवसाचा संपूर्ण पगार द्यावा लागतो त्यामुळे रेशन दुकानदार देखील आर्थिक संकटात सापडला आहे.
सतत होणाऱ्या सर्व्हर डाऊन मुळे जेवढा त्रास रेशन लाभधारकांना होतो तेवढाच त्रास रेशन दुकानदारांना पण होतो त्यात आर्थिक तोटा तर होतोच परंतु जनतेच्या रोशाला देखील सामोरे जावे लागते सध्या मशीनला दुपारी दोनच्या दरम्यान रेंज येते त्यानंतर रेशन पावती निघण्यास सुरुवात होते त्यामुळे लाभधारकांना जास्त त्रास होऊ नये म्हणून रात्री नऊ वाजेपर्यंत पावती काढण्याचे काम करावे लागते जेवढे सहकार्य आम्हाला ग्राहकांना करता येईल तेवढे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही दुकानदार करत असतो परंतु सर्व्हर डाऊन झाल्यावर आमचाही नाईलाज असतो. जुन्नर पुरवठ्याचे व वरीष्ठांचे वेळोवेळी आम्हास मार्गदर्शन व सहकार्य मिळते
उदापूर रेशन दुकानदार वर्षा मोहन वलव्हणकर.
