साळवाडी :-

दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने साळवाडी स्मशानभूमीची संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून स्मशानभूमीला मोठा धोका निर्माण झाला आहे.


स्मशानभूमी असलेली जागा ही पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाऊ नये, तसेच स्मशानभूमीची कमी असलेल्या जागेत वाढ होईल या उद्देशाने काँक्रीट संरक्षक भिंतीचे काम करण्यात आले होते. परंतु दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाच्या जोराने या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला.त्यामुळे स्मशानभूमीत भिंती लगत टाकलेला दगड ,माती,विटांचा भरावा मात्र नदीत प्रवाहात गेला. या प्रकारामुळे उर्वरीत संरक्षक भिंतीला सुध्दा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. सिमेंट काँक्रीट भिंतीचा भाग कोसळल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून हे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

प्रतिनिधी :राजेंद्र भोर साळवाडी

 

 

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!