जुन्नर:-

जुन्नर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने काही भागांत शेती आणि ओढ्यांवर बांधलेले रस्ते वाहून गेले आहेत.
या मुसळधार पावसाचा फटका साळवाडी गावातील बांगर मळा व चिंचवडे मळा या भागातील लोकांना जाण्या -येण्यासाठीअसणा-या ओढ्यावरील रस्त्याला बसला आहे. या ओढ्यावर सिमेंटचे पाईप टाकून रस्ता केला होता. परंतु दोन तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने ओढ्यामधील रस्त्यासाठी टाकण्यात आलेले सिमेंटचे पाईप वाहून जाऊन ब-याच प्रमाणावर रस्ता खचला आहे.

 

यामुळे लोकांची तसेच विद्यार्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी.अशी मागणी ज्ञानेश्वर बांगर,रंगनाथ बांगर व इतर शेतक-यांनी केली आहे.

प्रतिनिधी :राजेंद्र भोर,बोरी

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!